Join us

Deepika Padukone : काय सांगता? रणवीर नाही तर दीपिकाला 'या' दिग्दर्शकासोबत करायचं होतं लग्न...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 3:47 PM

Deepika Padukone : २०१८ साली दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. दीपिका व रणवीर दोघंही सुखाने नांदत आहेत. पण लग्नाआधी दीपिकाने रणवीर नव्हे तर लग्नासाठी एका दिग्दर्शकाच्या नावाची निवड केली होती...

दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) आयुष्यातील अतिशय महत्त्वांच्या व्यक्तींमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) याचंही नाव आहे.  अभिनेत्री म्हणून दीपिका घडत असताना भन्साळींनी तिच्यातील टॅलेंट नेमकं हेरलं. भन्साळींच्या 'राम-लीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' अशा चित्रपटांतून भव्यदिव्य सिनेमात दीपिकाची वर्णी लागली आणि बघता बघता दीपिकानं हिंदी चित्रपटविश्वात दबदबा निर्माण केला. याच भन्साळींसोबत लग्न करण्याची इच्छा एकदा दीपिकाने बोलून दाखवली होती.

२०१८ साली दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. दीपिका व रणवीर दोघंही सुखाने नांदत आहेत. पण लग्नाआधी दीपिकाने रणवीर नव्हे तर लग्नासाठी भन्साळींच्या नावाची निवड केली होती. यावरून सलमानने तिची चांगलीच मजा घेतली होती.

दीपिका आपल्या एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस ११ मध्ये आली होती. यावेळी सलमानने दीपिकाला काही प्रश्न विचारले होते. रणवीर सिंग, संजय लीला भन्साळी व शाहिद कपूर यांच्यापैकी कुणाशी लग्न करशील, कुणासोबत डेटवर जायला आवडेल आणि कोणाला  मारशील, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावेळी संजय लीला भन्साळींसोबत लग्न करायला आवडेल, रणवीर सिंगसोबत डेटवर जायला आवडेल, असं उत्तर दीपिकाने दिलं होतं. दीपिकाने भन्साळींसोबत लग्न करायची इच्छा व्यक्त केल्यावर सलमानने तिची चांगलीच मजा घेतली होती. भन्साळींसोबत लग्न करणार असशील तर ते फार काळ टिकणार नाही..., असं सलमान हसत हसत म्हणाला होता.

संजय लीला भन्साळींनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. पडद्यावर लार्जर दॅन लाईफ प्रेमकथा जिवंत करणाऱ्या भन्साळींनी अद्याप लग्न केलेलं नाही. एकेकाळी त्यांच्या व कोरिओग्राफर वैभवी मर्चंटच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. अर्थात भन्साळींनी एका मुलाखतीत आपल्या लव्हलाईफबद्दल खुलासा केला होता. मला आयुष्यात कधीही प्रेम झालं नाही. मी कधीही कुणाच्याही प्रेमात पडलो नाही. माझ्या वाढत्या वयाचा आणि लव्ह लाईफचा काहीही संबंध नाही. अर्थात प्रेम हे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतं आणि मी सुद्धा प्रेमाची अपेक्षा करतो, असं ते म्हणाले होते.

टॅग्स :दीपिका पादुकोणसंजय लीला भन्साळीरणवीर सिंग