दीपिका पादुकोणची JNU भेट नेटक-यांच्या निशाण्यावर, #BoycottChhapaak नंतर आता #TanhajiChallenge
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 10:16 AM2020-01-09T10:16:30+5:302020-01-09T10:16:35+5:30
आता सोशल मीडियावर #TanhajiChallenge हा नवा हॅशटॅग ट्रेंड होतोय.
अभिनेत्री दीपिका पदुकोण चा ‘छपाक’ हा सिनेमा उद्या 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. पण आता हा चित्रपट एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, ऐन रिलीजच्या तोंडावर दीपिका जेएनयूमध्ये पोहोचली आणि सगळीकडे दीपिकाचीच चर्चा रंगली. जेएनयूत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर दीपिकाने जेएनयूमधील विद्यार्थ्यांची भेट घेतली. तिच्यासोबत कन्हैय्या कुमार दिसल्याने अनेकांना ते रूचले नाही आणि अनेकांनी तिच्यावर टीका सुरू केली. एवढेच नाही तर यामुळे दीपिकाच्या आगामी ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी होऊ लागली. सोशल मिडियावर #BoycottChhapaakचा ट्रेंड सुरू झाला. हे सगळे एवढ्यावरच थांबले नाही तर आता सोशल मीडियावर #TanhajiChallenge हा नवा हॅशटॅग ट्रेंड होतोय.
Look who is winning the battle..!! #TanhajiChallenge#TanhajiTheUnsungWarriror#boycottchhapaakpic.twitter.com/ZIQjjPCVon
— Sparsh Sagar Deka 🇮🇳 (@SparshSagar1932) January 8, 2020
होय, अनेकांनी दीपिकाला #TanhajiChallenge दिले आहे. म्हणजे काय तर दीपिकाचा ‘छपाक’ न बघता अजय देवगणचा ‘तान्हाजी’ बघा, असे हे चॅलेंज आहे. अनेकांनी या #TanhajiChallenge या हॅशटॅगखाली दीपिकाच्या ‘छपाक’चे अॅडव्हान्स बुकिंग रद्द केले आहेत. तिकिट रद्द केल्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावरून शेअर केले जात आहेत.
एकंदर काय, तर दीपिकाला विरोध करणा-यांनी ‘छपाक’ विरूद्ध ‘तान्हाजी’ या युद्धाला तोंड फोडले आहे.
#boycottchhapaak#TanhajiChallengepic.twitter.com/VeevxSU9Uo
— ANKIT SINGH (@maahi_ankit) January 8, 2020
Accept the challenge #TanhajiChallenge. will you ??#boycottchhapaak#boycottdeepikapadukonepic.twitter.com/QDXaSYrGbH
— Neelesh Singh (@NeeleshSingh_) January 8, 2020
दीपिकाने जेएनयू आंदोलनात सहभाग नोंदवल्यानंतर काहींनी दीपिकाला पाठींबा दिला आहे तर काहींनी तिला विरोध चालवला आहे यामुळे सोशल मीडियावर दीपिकाच्या बाजूने आणि दीपिकाच्या विरोधात असे दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. ट्विटरवर #BoycottChhapaakआणि #ISupportDeepika असे दोन परस्परविरोधी हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.
Sad at JNU, happy at Airport, She is an Amazing Actress, Slow Claps #boycottchhapaak#TanhajiChallengepic.twitter.com/E7Eiykhvac
— Shiv Sharma (@shivsharmaIND) January 8, 2020