Join us  

हॉलिवूडमध्ये दीपिकाचे डेब्यू, विन डिझेलसोबत चित्रीकरण सुरू

By admin | Published: February 05, 2016 1:16 PM

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री असलेली दीपिका पडूकोणने बहुचर्चित XXX: The Return of Xander Cage या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे

ऑनलाइन लोकमत
टोरांटो, दि. ५ - आजच्या घडीला बॉलिवूडची टॉप अभिनेत्री असलेली दीपिका पडूकोणने हॉलिवूडमध्ये डेब्यू करताना बहुचर्चित XXX: The Return of Xander Cage या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. या चित्रपटासाठी खूप उत्सुक असलेली दीपिका चित्रपटात प्रसिद्ध हॉलिवूड स्टार विन डिझल सह झळकणार आहे. या चित्रपटासाठी दीपिकाने खूप मेहनत घेतली असून काही दिवसांपूर्वी तिच्या जिमममधील ट्रेनिंगचे फोटोही सोशल साईट्सवर झळकले होते.
कॅनडामध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली असून डी.जे. कार्उसो या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. विन डीजेल यामध्ये 'Xander Cage' ची भूमिका निभावताना दिसणार आहे तर दीपिका 'Serena'च्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक डी.जे. कार्उसो आणि विन डिझेलने चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले असून चाहत्यांचे आभारही मानले आहेत.