Join us

रणवीर नाही तर नोवाक जोकोविच आहे दीपिकाचा "पेशवा"?

By admin | Published: July 10, 2017 4:25 PM

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या विविध अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या रिलेशनशिपमुळे नेहमी चर्चेत असते.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या बोल्ड अदांनी घायाळ करणारी मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या रिलेशनशिपमुळे नेहमी चर्चेत असते. पुन्हा एकदा याच कारणासाठी ती चर्चेत आली आहे.  यावेळी दीपिकाचं नाव सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच याच्यासोबत जोडलं गेलंय.  याबाबतचा खुलासा खुद्द जोकोविचची एक्स गर्लफ्रेंड नताशा बेलवेलेकने केला आहे. दीपिका आणि जोकोविच एकमेकांना डेट करत असल्याचा दावा तिने केला आहे.   

परदेशातील मीडियामध्ये येत असलेल्या वृत्तानुसार, ""मला वाटतं दीपिकाला डेट केल्यावरच जोकोवीच आनंदी राहील"" असं विधान नताशा बेलवेलेक हिने केलं आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जोकोवीच आणि त्याची पत्नी अॅलेना जोकोविच यांच्यातील संबंध बिघडले आहेत. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.
 
दीपिका आणि जोकोविचच्या नात्याबाबत चर्चा रंगण्याचं मुख्य कारण म्हणजे, गेल्या वर्षी 2016 मध्ये दीपिका आणि जोकोवीच या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. दोघांनी लॉस-एंजेलिसमध्ये  "द नाइस गाय" येथे एकत्र डिनर केलं होतं. त्यानंतर दोघांना एकाच गाडीत देखील पाहिलं गेलं.  
 
नोवाक जोकोविचचं नाव याआधी अनेक महिलांसोबत जोडलं गेलं आहे. यामध्ये युक्रेनची वकील व्हिक्टोरिया, लेडी डीजे ली अशी काही प्रसीद्ध नावं आहेत. दुसरीकडे वर्तमान स्थितीत दीपिका पादुकोण आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग रिलेशनशिपमध्ये आहेत असं बोललं जातं.  
अबब ! दीपिका पादुकोण एका सिनेमासाठी घेते एवढं मानधन-
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील सिनेमांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका पादुकोणनं दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित तसेच प्रदर्शनापूर्वी वादग्रस्त ठरलेला आगामी "पद्मावती" सिनेमासाठी तब्बल 12 कोटींपर्यंत मानधन घेतल्याची चर्चा सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे.  
 संजय लीला भन्साळी यांच्या ""गोलियों की रासलीला रामलीला"" आणि "" बाजीराव मस्तानी"" सिनेमानंतर दीपिका पुन्हा एकदा त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प ""पद्मावती"" सिनेमात दिसणार आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ""रामलीला"" सिनेमासाठी दीपिकाला एक कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते.  या सिनेमाच्या दोन वर्षांनंतर आलेल्या ""बाजीराव मस्तानी""सिनेमासाठी तिला 7 कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले होते. आता दीपिकाला आगामी सिनेमा ""पद्मावती""साठी 12 कोटी रुपये मानधन ऑफर करण्यात आलेत. यानिमित्तानं 10 कोटी रुपयांचा आकडा पार करणारी पहिली अभिनेत्री होण्याचा मान दीपिका पादुकोणनं मिळवला आहे.