Join us  

'XXX 3' ट्रेलरमध्ये दीपिकाचा सुपरअॅक्शन अवतार

By admin | Published: October 17, 2016 8:31 AM

हॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेली बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'XXX: The Return of Xander Cage' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - हॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेली बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'XXX: The Return of Xander Cage' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये दीपिकाला जास्त जागा न मिळाल्याचं पाहून चाहते नाराज झाले होते. मात्र या ट्रेलरमध्ये दीपिकाचा सुपरअॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. दीपिकाने बिग बॉसच्या सेटवर सलमान खानसोबत हा ट्रेलर रिलीज केला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर दीपिकाचा सुपरहॉट आणि जबररदस्त अॅक्शन अवतार पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 
 
('द रिटर्न ऑफ एक्सँडर केज’ च्या सेटवरील दीपिकाचा हॉट लूक)
(मस्तानी'च्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचा टीझर रिलीज)
 
दीपिकाचा हा पहिलाच हॉलिवूड सिनेमा आहे. ट्रेलरमधील दीपिकाच्या व्यक्तिरेखेने चाहत्यांची उत्सुकता अजून वाढवली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. ४८ वर्षीय विन डीजेल यामध्ये 'Xander Cage' ची भूमिका निभावताना दिसणार आहे तर दीपिका 'Serena'च्या भूमिकेत दिसणार आहे. कॅनडामध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे. या चित्रपटासाठी दीपिकाने खूप मेहनत घेतली आहे. शुटिंगदरम्यान तिचे जिमममधील ट्रेनिंगचे फोटोही सोशल साईट्सवर झळकले होते.