70 आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती नवल (Deepti Naval ) 3 फेब्रुवारी रोजी त्यांचा 70 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1953 रोजी अमृतसर येथे झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमी कलाकार म्हणून केली. आर्ट फिल्म्सची नॉन ग्लॅमरस नायिका म्हणून दीप्ती Deepti Naval नेहमीच ओळखल्या जातात. दीप्ती नवल आणि फारुख शेख यांची जोडी खूप गाजली. दोघांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट केले. आज दीप्ती यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगत आहोत...
'चश्मे बद्दूर'मध्ये अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवली.दीप्ती यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी चित्रकार व्हावे पण दीप्ती(Deepti Naval) यांना थिएटरची आवड होती. दीप्ती यांनी करिअरची सुरुवात 1978 मध्ये आलेल्या जुनून या चित्रपटातून केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते आणि या चित्रपटाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. पण आजही त्या 'चश्मे बद्दूर'ची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. या चित्रपटात तिने एका सेल्स गर्लची भूमिका साकारली होती जी डिटर्जंट पावडर विकायची.
दीप्ती अभिनयाचा कोर्स न करता इंडस्ट्रीत आल्या आणि आज दीप्ती त्यांच्या अभिनयासाठी ओळखल्या जातात. 80 च्या दशकात त्यांनी 'प्यारी लडकी, नेक्स्ट डोर गर्ल' सारख्या भूमिका केल्या. चित्रपटांतील त्यांच्या भूमिका समीक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. पण त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
दीप्ती यांच्यावर सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप झाल्यानंतर त्या वादात सापडल्या होत्या. एके दिवशी त्या चष्मे बद्दूर या चित्रपटासाठी मुलाखत देत होत्या, तेव्हा सोसायटीमधील काही लोक अचानक घरात घुसले आणि मुलाखत बंद करण्यासाठी सांगू लागले. दीप्ती घरात चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत असा त्यांचा समज झाला होता. सोसायटीवाल्यांच्या वागण्याचा दीप्ती यांना चांगलाच मनस्ताप झाला होता. त्यामुळे त्यांनी काही दिवसांनी हे घर सोडले. खरे तर त्या ३० वर्षं त्या घरात राहिल्या होत्या.