आपण नेहमीच सुखद शेवट असलेल्या काल्पनिक प्रेमकथा ऐकत मोठे झालो आहोत. पण वास्तविक जीवनात हे खरे ठरते का? अनेकदा नाते अक्लिष्ट असल्याचे जाणवते. प्रेम हे मनापासून केले जाते, ते अतूट आणि निर्विवाद असते. पण काहीवेळा पुन्हा प्रेमाची भावना निर्माण होणे शक्य होत नाही.
यंदाच्या व्हॅलेन्टाइन्स डेला एमएक्स प्लेअर नवीन एमएक्स ओरिजिनल सिरीज 'पवन अॅण्ड पूजा'सह प्रेमकथा सादर करत आहे. हा नात्यांचा ड्रामा तीन जोडप्यांच्या जीवनांना सादर करतो. या तिन्ही जोडप्यांची नावे पवन आणि पूजा आहेत. जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये असलेल्या या तिन्ही जोडप्यांना जाणीव होते की, त्यांचे प्रेम सशर्त, भंग पावणारे आणि प्रश्नांनी भरलेले आहे.
विश्वासाने एकत्र असलेले आणि वयाची साठी गाठलेले पवन आणि पूजा कालरा (दिप्ती नवल आणि महेश मांजरेकर) दिलगिरी व्यक्त करण्याची यादी तयार करण्याचे आणि ते तरूण वयात करू न शकलेल्या गोष्टी करण्याचे ठरवतात. वयाच्या ४०व्या वर्षांमध्ये वैवाहिक जीवन स्थिर ठेवण्याचा संघर्ष करणारे पवन (शर्मन जोशी) आणि पूजा (गुल पनाग) यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण त्यांच्यामधील प्रेम पहिल्यासारखे राहिलेले नाही. वयाच्या २०व्या वर्षामध्ये असलेले पवन श्रीवास्तव (तारूक रैना) आणि पूजा महेश्वरी (नताशा भारद्वाज) यांना त्यांच्यापेक्षा त्यांचे ऑनलाइन मित्रमैत्रिणी आणि आभासी विश्व आवडते. पण ते किती काळ टिकणार आहे? जटिल नाती आणि त्यामधील अधिक जटिल भावना या १० एपिसोड्सच्या सिरीजमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. ही सिरीज आपल्या सर्वांना एकत्र ठेवणाऱ्या भावनेच्या क्लिष्टतेची परीक्षा घेते आणि ती भावना म्हणजे प्रेम.
दिप्ती नवल त्यांच्या भूमिकेबाबत बोलताना म्हणाल्या, ''माझ्या मते कोणतेही नाते विश्वासाशिवाय टिकत नाही. पूजा कालरा या व्यक्तिरेखेला विविध छटा असल्याने मी या सिरीजमध्ये काम करायला होकार दिला.''
महेश मांजरेकर म्हणाला, ''पवन कालराचा जीवनाप्रती असलेला उत्साह आणि त्याचा प्रामाणिकपणा मला आवडला. ही ड्रामा सिरीज विविध पिढ्यांमधील तीन जोडप्यांच्या नात्यांमधील जटिलतांना समोर आणते. मला हे कथानक खूपच आवडले.''
शर्मन जोशी म्हणाला, ''नेहमीच्या रोमँटिक कथांपेक्षा आम्ही प्रेमाची 'दुसरी' बाजू सादर करण्याचा प्रयत्न केला आहे, जी जीवनामध्ये कधीच दिसण्यात आलेली नाही. याचा प्रत्येक वयोगटातील जोडप्यांमध्ये 'ही माझीच कथा आहे किंवा हे माझेच नाते आहे' ही भावना निर्माण करण्याचा उद्देश आहे.''
त्याची पत्नी पूजाची भूमिका साकारणारी गुल पनाग म्हणाली, ''माझी भूमिका पूजा मेहरा ही गंभीर स्वभावाची आहे. ती एक प्रबळ स्वावलंबी महिला आहे. तिला परंपरेखाली बुजून राहणे आवडत नाही. तिची नेहमीच कोणतेही काम पूर्णत्वास नेण्याची इच्छा असते, मग त्यासाठी काहीही करायला लागले तरी चालेल. तिच्या या स्वभावाशी मी जुळवून घेऊ शकते.''
तरूण पवन श्रीवास्तवची भूमिका साकारणारा तारूक रैना म्हणाला, ''आपल्या सर्वांमध्ये पवन आणि पूजा आहेत. प्रेम, विविध टप्पे, जटिलता, नकार अशा गोष्टींचा सामना केलेल्या प्रत्येक जोडप्याची ही एक कथा आहे.''