Join us

"इस बार तेरे शहर में, जो सावन आया है…", अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:57 IST

अमृता यांचं 'सावन' हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या एक उत्तम गायिकाही आहेत. आजवर त्यांनी अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांची सगळीच गाणी चर्चेत येतात. आता नवीन गाणं (Amruta Fadnavis New Song) घेऊन त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

अमृता यांचं 'सावन' हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही माहिती दिली आहे. 'इस बार तेरे शहर में , जो सावन आया है, उसे मेरी आँखों ने…बरसना सिखाया हैं, असे गाण्याचे बोल आहेत. 'सावन' हे गाणं रजत नागपाल, केशव त्योहार यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर गीतकार राणा सोटलने लिहिलं असून अमृता फडणवीसांच्या आवाजात ते रेकॉर्ड करण्यात आलं आहे. अमृता यांच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

अमृता फडणवीस गाण्यांमुळे कायम चर्चेत असतात. गाणी गाणं, त्यांचं सादरीकरण करणं; हे त्यांचे हौसेचे विषय आहेत. यापूर्वी त्यांच्या अनेक गाण्यांवरुन त्यांना ट्रोल केलं केलं. तरीही त्यांनी गाणं सोडलं नाही. अमृता फडणवीस या बँकर आहेत. मात्र,गायनाची प्रचंड आवड असल्यानं त्यांचे अनेक म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. त्यांनी गायलेले 'शिव तांडव स्तोत्र' देखील चांगलेच लोकप्रिय झाले. तर अमृता यांचं 'मूड बना लिया' हे गाणंही चांगलंच व्हायरल झाल होतं. यासोबतच त्यांचं 'सारे जहाँ से अच्छा' हे देशभक्तीपर गाणंदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं.

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीससेलिब्रिटीबॉलिवूडयु ट्यूबपाऊस