Join us

क्रीडा विषयावरील सिनेमात काम करण्याची इच्छा!

By admin | Published: June 02, 2017 4:44 AM

कलाकार म्हणून तुमची वाढ खुंटते असं मला वाटतं. त्यामुळेच अशा भूमिकांना तत्काळ नकार देते असे पूजा बत्राने म्हटले आहे. रुपेरी

-Suvarna Jain-कलाकार म्हणून तुमची वाढ खुंटते असं मला वाटतं. त्यामुळेच अशा भूमिकांना तत्काळ नकार देते असे पूजा बत्राने म्हटले आहे. रुपेरी पडद्यावर ‘मिरर इमेज’ नावाचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून अभिनेत्री पूजा बत्रा हिंदी सिनेमात बऱ्याच वर्षांनंतर कमबॅक करत आहे. हा एक थ्रिलर सिनेमा असून, कथाही उत्कंठावर्धक आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री पूजा बत्राशी साधलेला हा संवाद..."मिरर इमेज" या शीर्षकावरून या सिनेमाच्या कथेत काहीतरी गूढ असेल असं वाटतं आहे. सिनेमाची स्क्रीप्ट दिग्दर्शकानं ऐकवली तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती?- या सिनेमाचे दिग्दर्शक विजीत शर्मा यांनी या सिनेमातील भूमिकेसाठी माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला सिनेमाची कथा वाचायला दिली. स्क्रीप्ट वाचताच ती एक वेगळी आणि नावीन्यपूर्ण कथा असल्याचं मला वाटलं. मी याआधी अशा प्रकारची भूमिका कधीच साकारली नव्हती. याआधी हॉलिवूडमध्ये ‘वन अंडर द सन’ आणि गेल्या वर्षी ‘किलर पंजाबी’ सिनेमात मी काम केलं. हिंदी सिनेमात कमबॅक करायचं तर काहीतरी वेगळं असेल, ज्यात मजा येईल असं काम करायचं होतं. त्यामुळेच हा सिनेमा स्वीकारला. याआधी माझी इतर कामं सुरू होती. मला त्यावर लक्ष केंद्रित करायचं होतं. त्यामुळे हिंदी सिनेमा स्वीकारले नव्हते.एखादी भूमिका निवडताना तुझ्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ?- हॉलिवूडमध्ये मी काम केलेल्या सिनेमाची कथा वेगळी होती. त्यात काहीतरी नावीन्यपूर्ण होतं. भूमिकेत काहीतरी वेगळं साध्य होतं. त्यात बिल्कुल नाटकीपणा नव्हता. मला अशाच पद्धतीचं काम करायला आवडतं. त्याच त्याच पद्धतीच्या भूमिका साकारण्यात काहीही मजा नसते. कारण तिथे कलाकार म्हणून तुमची वाढ खुंटते असं मला वाटतं. त्यामुळेच अशा भूमिकांना तत्काळ नकार देते. माझ्या भूमिका निवडताना मी खूप काळजी घेते. या सिनेमातील भूमिकाही मला हटके वाटली. अशी स्क्रीप्ट माझ्याकडे आजवर कुणीच आणली नव्हती. त्यातील विषय भावला आणि रसिकांनाही माझी ही भूमिका आवडेल अशी आशा आहे. प्रादेशिक सिनेमा चांगली कामगिरी करत असून तू स्वत: पंजाबी सिनेमातही काम केलं आहेस. मराठी सिनेमांविषयी तू ऐकलं आहेस का? मराठी सिनेमा पाहायला आवडेल का?- आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत. इंटरनेट, टीव्ही या सगळ्या गोष्टी आहेत. असं असलं तरी सिनेमा पाहायचा तर तो सिनेमा हॉलमध्येच असं मला वाटतं. मराठी सिनेमांबाबत मी बरंच ऐकलं आहे. नक्कीच खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. इथं आल्यापासून मराठी सिनेमा पाहण्याची इच्छा झाली आहे. काही वर्षांआधी टूरिंग टॉकिज हा मराठी सिनेमा पाहिला होता. आॅस्करसाठी अमेरिकेत हा सिनेमा आला होता. तिथं तंबू लावून हा सिनेमा दाखवण्यात आला होता. तृप्ती भोईर यांचा हा सिनेमा खूप भावला होता. आणखी बरेच मराठी सिनेमा आहेत ज्यांची नावं ऐकली आहेत. त्याचं काम ऐकलंय, त्यामुळे आता मराठी सिनेमा नक्की पाहणार आहे. तुझ्या ड्रीम रोलविषयी आणि सध्या इतर काय करतेस ते जाणून घ्यायला आवडेल.- मला आगामी काळात क्रीडा विषयावरील सिनेमा करण्याची इच्छा आहे. विशेषत: हाच माझा ड्रीम रोल आहे. महिलाप्रधान सिनेमाही चांगली कामगिरी करत आहेत. मी मार्शल आर्टचंही ट्रेनिंग घेत आहे. त्यामुळे मार्शल आटर््सवर आधारित सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. तू हॉलिवूडमध्येही काम केलं आहेस तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये तुला काय फरक जाणवला?- बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये तांत्रिक बाबी सोडल्या तर फारसा काही फरक आहे असं मला वाटत नाही. भाषेचा फरक आहे. आपल्याकडे हिंदी आहे, तिकडे इंग्रजी आहे. तिथे प्रोफेशनॅलिझम खूप आहे. तुम्ही तिथे लेट झालो अशी सबब सांगू शकत नाही. तांत्रिकदृष्ट्या ते पुढारलेले असतीलही तरीसुद्धा आपल्याकडील कलाकार हे त्यांच्यापेक्षा ग्रेट आहेत, असं मला वाटतं.