सुपरस्टार आमिर खान(Aamir Khan)चा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) त्याच्या साधी राहणीमानामुळे चर्चेत असतो. तो नेहमी ऑटोने प्रवास करताना दिसतो. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आमिर खानने सांगितले होते की, त्याला मुलगा जुनैदसाठी कार घ्यायची होती, जेणेकरून तो आरामात प्रवास करू शकेल. मात्र जुनैदने नेहमीप्रमाणे कार घेण्यास नकार दिला. दरम्यान आता आमिर खानच्या या वक्तव्यावर जुनैद खानची प्रतिक्रिया समोर आली आहे.
कनेक्ट सिनेला दिलेल्या मुलाखतीत जुनैद खानला विचारण्यात आले की, वडील आमिर खानने बऱ्याच मुलाखतीत सांगितले की, तुला कार ऐवजी ट्रेनने प्रवास करायचा असतो. त्यावर जुनैद म्हणाला की, पप्पा छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्त्व देतो. मी फक्त प्रवास करण्यासाठी सोप्पा पर्याय निवडतो. मी मुंबईत नेहमीच रिक्षाने प्रवास करतो कारण त्यामुळे फिरणे खूप सहज आहे आणि पार्किंगचेदेखील चिंता नसते.
जुनैदबद्दल आमिर म्हणाला होता...यापूर्वी न्यूज १८च्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत आमिर खानने मुलगा जुनैदला शालेय मुलासारखे म्हटले होते. ज्याला सर्व काही माहित आहे आणि नेहमीच क्लासमध्ये टॉप करतो. मात्र त्याला वेगळे राहायला आवडते. तो लोकांशी फार कमी बोलतो. आमिरने सांगितले की, जुनैद शांत स्वभावाचा आहे आणि निर्मळ मनाचा आहे.
कार विकत घेऊ देत नाही जुनैदआमिरने सांगितले की, जुनैद आता ३० वर्षांचा आहे आणि बालपणापासून मला त्याच्यासाठी कार विकत घ्यायची होती. पण आतापर्यंत त्याने मला कार खरेदी करू दिली नाही. आताही तो पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतो. बस आणि ट्रेनने प्रवास करायला त्याला आवडतो.
'महाराज'मधून जुनैद खानने केलं पदार्पणजुनैदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचा पहिला चित्रपट महाराज अलिकडेच प्रदर्शित झाला. यातील त्याच्या कामाचं खूप कौतुक झाले. यात त्याच्यासोबत जयदीप अहलावत, शर्वरी वाघ आणि शालिनी पांडे मुख्य भूमिकेत आहे.