देवदत्त नागेच्या पायाला झाली दुखापत, तरी देवदत्त म्हणतो शो मस्ट गो ऑन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 07:06 PM2018-12-04T19:06:35+5:302018-12-04T19:07:31+5:30

देवदत्त सध्या एका चित्रपटाचे चित्रीकरण करत असून चित्रीकरणादरम्यान देवदत्तच्या पायाला दुखापत झाली आहे.

Devadatta Nage's foot was hurt, Devadatta says show Must Go On | देवदत्त नागेच्या पायाला झाली दुखापत, तरी देवदत्त म्हणतो शो मस्ट गो ऑन

देवदत्त नागेच्या पायाला झाली दुखापत, तरी देवदत्त म्हणतो शो मस्ट गो ऑन

googlenewsNext
ठळक मुद्देदेवदत्त सध्या चित्रीकरणात व्यग्रस्टंट करताना देवदत्तच्या पायाला झाली दुखापत


जय मल्हार या मालिकेतील खंडेराया या भूमिकेमुळे देवदत्त नागे हे नाव घराघरात पोहोचले. त्याच्या जय मल्हार या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरी आजही प्रेक्षकांच्या मनात या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा ताजी आहे. गेल्या तीन वर्षांपासून जय मल्हार या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले होते. खंडोबा या व्यक्तिरेखेला तर चाहत्यांचे विशेष प्रेम लाभले होते. गेल्या तीन वर्षांपासून खंडेराया याच भूमिकेत प्रेक्षकांनी देवदत्तला बघितले आहे. देवदत्तने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आता देवदत्तचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तो लवकरच एका चित्रपटात दिसणार असून सध्या देवदत्त चित्रीकरणात व्यग्र आहे. नुकतेच या सेटवर चित्रीकरणादरम्यान देवदत्तच्या पायाला दुखापत झाली आहे. तरीदेखील चित्रीकरणात खंड पडू नये म्हणून लगेचच त्याने चित्रीकरण सुरूवातदेखील केली.
देवदत्त सध्या एका चित्रपटाचे चित्रीकरण करतो आहे. या चित्रीकरणादरम्यान स्टंट करत असताना देवदत्तचा पाय मुरगळला आणि क्रॅम्प आला. त्याला दुखापत झाली असूनही त्याने चित्रीकरण सुरूच ठेवले आहे. यातून देवदत्त नागेची कामाप्रती असलेली निष्ठा पाहायला मिळत आहे.
देवदत्त कोणत्या सिनेमाचे चित्रीकरण करतो आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र हा मोठा प्रोजेक्ट असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्याच्या या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. 
 

Web Title: Devadatta Nage's foot was hurt, Devadatta says show Must Go On

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.