छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी ‘देवमाणूस’ (Devmanus) आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतेय आणि या बातमीने प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ‘देवमाणूस 2’चा (Devmanus season 2) प्रोमो रिलीज झाला आणि सगळीकडे ‘देवमाणूस 2’चीच चर्चा रंगली. अगदी बॉलिवूडमध्येही ‘देवमाणूस 2’चीच चर्चा रंगली. हो तर, खुद्द रणवीर सिंग (Ranveer Singh) सुद्धा ‘देवमाणूस 2’च्या प्रमोशनसाठी सज्ज झाला.होय, ‘देवमाणूस’ मालिकेत डिम्पलची भूमिका साकारणीर अभिनेत्री अस्मिता देशमुखने (Asmita Deshmukh) इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रणवीर सिंग ‘देवमाणूस 2’चं प्रमोशन करताना दिसतोय.
‘अख्खा पब्लिक को मालूम है, कोण आनेवाला है, तेरे को नही मालूम..,’ असा रणवीरचा ‘सूर्यवंशी’ सिनेमातील डायलॉग या व्हिडीओत वापरला गेला आहे आणि तो मालिकेला चांगलाच फिट बसला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. 'देवमाणूस' मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. बाबू, सरू आजी, टोण्या, डिम्पी, वंदी आत्या, नाम्या, बजा ही पात्रं नव्या मालिकेतही पाहायला मिळणार का हे पाहणं देखील उत्सुकतेचं असणार आहे. साताऱ्यातील एका छोट्याशा खेडेगावात गावकऱ्यांची फसवणूक करुन एक कंम्पाऊंडर डॉक्टर असल्याचं भासवत लोकांच्या जीवाशी खेळ करत असतो आणि गावकऱ्यांना लुबाडतो. तसंच गावातील महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करुन त्यांना जीवानिशी मारतो अशी ही डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग या बोगस डॉक्टरची कथा होती. अभिनेता किरण गायकवाड यानं अजित कुमार देवची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचं कौतुक देखील झालं होतं. 15 ऑगस्टला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला.