दिवंगत अभिनेते देवानंद यांचा नातू ऋषी आनंद बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो गोविंदाचा गाजलेला चित्रपट 'साजन चले ससूराल'च्या रिमेकमधून रुपेरी पडद्यावर एन्ट्री करणार आहे. या चित्रपटाबाबत तो खूप उत्सुक असल्याचे त्याने सांगितले.
ऋषी आनंद म्हणाला की, 'साजन चले ससूराल २' या चित्रपटाबाबत मी खूपच उत्साही आहे. मात्र आता याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही.
ऋषी हा अभिनेता - निर्माता सुनिल आनंद यांचा मुलगा आहे. देवनंद यांचा एकमेव मुलगा असलेल्या सुनिल यांनी 'आनंद और आनंद', 'कार थिफ' आणि मैं तेरे लिए या चित्रपटात काम केले होते. त्यांनी 'मास्टर' आणि 'वेगाटर मिक्सर' या इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. ऋषी आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडण्यात यशस्वी होईल का हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.