भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. दोघांचा चार वर्षांचा संसार मोडला. घटस्फोटानंतर युदवेंद्र आयपीएलमध्ये व्यस्त आहे. तर धनश्री वर्माचं मात्र नशीबच उजळलं आहे. नुकताच तिचा एक म्युझिक अल्बम रिलीज झाला. यामध्ये तिचा दमदार डान्स परफॉर्मन्सही आहे. यानंतर आता तिला दोन मोठे रिएलिटी शो ऑफर झाले आहेत. कोणते आहेत ते शो?
धनश्री वर्मा सध्या चर्चेत आहे. घटस्फोटानंतर तिला दोन मोठे शो ऑफर झाले आहेत. त्यातला एक म्हणजे 'खतरो के खिलाडी' (Khatron Ke Khiladi). या शोचा १५ वा सीझन लवकरच सुरु होतोय. मेकर्सने या सीझनसाठी धनश्री वर्माशी संपर्क साधला आहे. यावर धनश्री होकार दिला आहे का हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र सगळं काही सुरळीत झालं तर धनश्री रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी' मध्ये स्टंट करताना दिसू शकते. याशिवाय या सीझनसाठी अविनाश मिश्रा, ईशा सिंह, मल्लिका शेरावत, खूशबू पाटनी यांनाही अप्रोच केलं गेलं आहे.
इतकंच नाही तर धनश्रीला बिग बॉस ओटीटी ४' (Bigg Boss OTT 4) चीही ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. घटस्फोटामुळे धनश्री लाईमलाईटमध्ये असल्याने टीआरपीसाठीही तिचा फायदा होऊ शकतो. यावरही धनश्रीकडून काहीच अपडेट आलेलं नाही. मात्र एकूणच धनश्रीचं नशीब उजळलं आहे.
धनश्री वर्मा डान्सर आहे. ती याआधी २०२३ साली 'झलक दिखला जा ११' मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिचा तेव्हाचा पती युजवेंद्र चहलही तिला पाठिंबा देण्यासाठी एका एपिसोडवेळी आला होता. आता दोघंही वेगळे झाले आहेत.