Join us

धनुषने रजनीकांत यांच्या बंगल्याशेजारीच घेतलं आलिशान घर, आता होतोय ट्रोल; नक्की कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 11:06 AM

काही महिन्यांपूर्वीच धनुष आणि रजनीकांत यांच्या लेकीचा घटस्फोट झाला आहे.

थलायवा रजनीकांत (Rajinikant) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) आणि अभिनेता धनुष (Dhanush) यांचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला. एकमेकांच्या सहमतीने त्यांनी २० वर्षांचा संसार मोडला. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर नोट शेअर करत चाहत्यांना याची कल्पना दिली. आता नुकतंच धनुषनेरजनीकांत यांच्या बंगल्याशेजारीच आलिशान घर खरेदी केलं आहे. यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये त्याने दिलेल्या भाषणामुळे तो लोकांच्या निशाण्यावर आला आहे. त्याने नुकतंच आपल्या आगामी 'रायन' सिनेमाच्या म्यूझिक लाँचला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये धनुषने रजनीकांत यांच्या बाजूलाच बंगला खरेदी केल्याचा उल्लेख केला. तो म्हणाला, "जर मला माहित असतं की पॉएस गार्डनजवळ घर घेणं एवढा मोठा मुद्दा बनेल तर मी एक छोटंसंच घर घेतलं असतं. मी पॉएस गार्डनजवळ घर नव्हतं घ्यायला पाहिजे का?  जर मी रस्त्यावर राहत असतो तर मी केवळ त्याच लायक होतो का?"

तो पुढे म्हणाला, "हे घर घेण्यामागे एक छोटी गोष्ट आहे. जेव्हा मी १६ वर्षांचा होतो मी आणि माझा एक मित्र बाईकवरुन कॅथल रोडवरुन जात होतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की मी कोणाचा चाहता आहे. मला तेव्हा थलायवाचं घर पाहायचं होतं. मी एकाला विचारलं की रजनी सरांचं घर कुठे आहे? त्याने आम्हाला रस्ता सांगितला तसं आम्ही गेलो. तेव्हा आम्ही पाहिलं की या ठिकाणी बरेच पोलिस अधिकारी आहे. आम्ही पुन्हा एकाला विचारलं की रजनी सरांचं घर कुठे आहे तर तो म्हणाला घर बघून लगेच निघा जास्त थांबू नका. तेव्हाच मी विचार केला होता की मी सुद्धा अशाच पॉश परिसरात एक दिवस घेईन. आज मी १६ वर्षांच्या त्या मुलाचं स्वप्न पूर्ण केलं आणि स्वत:ला घर गिफ्ट केलं."

आता धनुषचं हे भाषण काही लोकांना प्रेरित करणारं होतं. मात्र सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांना असंही वाटत आहे की धनुष फिल्मी कुटुंबातला असूनही स्वत:ला आऊटसायडर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. यामुळेच तो आता ट्रोल होत आहे. एकाने लिहिले, 'रजनीकांत आऊटसाइडर होते आणि स्वत: स्टार बनले. तू तर नेपो किड आहेस. त्यांच्यासोबत तुलना करण्याची हिंमत कशी झाली',''याला वाटतं हात रजनी आहे हे जरा अती होतंय.','मला धनुष अभिनेता म्हणून आवडतो पण तो रजनीसरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतोय हे पाहून वाईट वाटलं.'

टॅग्स :धनुषरजनीकांतTollywoodट्रोलचेन्नईसोशल मीडियासुंदर गृहनियोजन