२०२२ साली आलेला 'धर्मवीर' (Dharmaveer) सिनेमा चांगलाच गाजला. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत या सिनेमाने लोकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. प्रसाद ओकने (Prasad Oak) सिनेमात 'धर्मवीर' आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. तर प्रवीण तरडेंनी (Pravin Tarde) सिनेमाचं दिग्दर्शन केलं. या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाईंनी केली होती. याशिवाय मंगेश यांनी सिनेमात पत्रकाराची छोटी भूमिकाही साकारली. धर्मवीर 2 (Dharmaveer 2) च्या रिलीजआधीच मंगेश यांनी सर्वांना आनंदाची बातमी सांगितलीय.
मंगेश देसाईंनी सोशल मीडियावर एक व्हि़डीओ शेअर केलाय. या व्हि़डीओत मंगेश देसाईंच्या घराबाहेर फुलांनी सजवलेली नवीकोरी पाटी लावलेली दिसतेय. या पाटीवर मंगेश शलाका साहिल देसाई अशी नावं दिसत आहेत. मंगेश आणि त्यांचं कुटुंब पारंपरिक पोशाखात या पाटीकडे बघत आहे. तिघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसतोय.
आज तो में बहुत खुश हू आप भी होंगे ना मेरे लिए, असं कॅप्शन मंगेश यांनी या व्हिडीओला दिलंय. 'धर्मवीर' साठी मंगेश यांनी त्यांचं घर विकलं, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे 'धर्मवीर 2' च्या रिलीजआधीच मंगेश यांचा नवीन घरात गृहप्रवेश झालाय. त्यांच्या चाहत्यांनी आणि मनोरंजन विश्वातल्या कलाकारांनी मंगेश यांचं अभिनंदन केलंय. मंगेश 'धर्मवीर 2' च्या माध्यमातून पुन्हा एकदा निर्मितीची धुरा सांभाळत आहेत.