करण जोहर (Karan Johar) दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rockey Aur Rani Ki Prem Kahani ) २८ जुलैला रिलीज झाला आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात आलिया भट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील एक सीन पाहून सगळेच अवाक् झाले. हा सीन म्हणजे धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा लिपलॉक सीन. बरेच लोक या सीनवर टीका करत आहेत. दरम्यान आता धर्मेंद्र यांनी या सीनवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये आलिया भट आणि रणवीर सिंग यांच्या केमिस्ट्रीसोबतच धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनाही पसंती मिळाली आहे. चित्रपटात अनेक वर्षांनंतर धर्मेंद्र शबाना आझमीला भेटतात तेव्हा ते त्यांच्यासाठी अभी ना जावो छोडकर हे गाणे गात गातात आणि नंतर त्यांची किस घेतात. या सीनवर धर्मेंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी किसिंग सीनबद्दल सांगितले. ते म्हणाले की, मी ऐकले आहे की मी आणि शबानाने किसिंग सीनने प्रेक्षकांना हैराण केले आहे. त्याचबरोबर त्यांनी या सीनचे कौतुक केले आहे. मला वाटते की लोकांना याची अपेक्षा नव्हती, ती अचानक आली ज्याचा खूप परिणाम झाला आहे. लाइफ इन अ मेट्रो या चित्रपटात मी नफीसा अलीला शेवटचे किस केले होते आणि तिचे कौतुकही झाले होते.
रोमांससाठी वयाची मर्यादा नसतेधर्मेंद्र पुढे म्हणाले, जेव्हा करणने हा सीन सांगितला तेव्हा मला याची अपेक्षा नव्हती. मी ते समजून घेतले आणि मला जाणवलं की, हा सीन चित्रपटसाठी गरजेचा आहे. हा सीन जबरदस्तीने टाकलेला नाही. मी हा सीन करण्यासाठी होकार दिला. तसेच माझे मत आहे की, रोमांससाठी वयाची मर्यादा नसते. वय हा फक्त आकडा आहे आणि वयाचा विचार न करता दोन लोक किस करुन एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करु शकतात. हे करत असताना मला आणि शबाना दोघांनाही कसलाही त्रास झाला नाही कारण ते खूप छान चित्रीत झाले आहे.
करणने अप्रतिम चित्रपट बनवलाय
चित्रपटाविषयी बोलताना धर्मेंद्र म्हणाले की, मला नेहमी वाटते की मी आणखी चांगलं काम करू शकलो असतो (हसून म्हणाले). पण करणने अप्रतिम चित्रपट बनवला आहे आणि तो खूप चांगला दिग्दर्शक आहे. त्याच्यासोबतचे हे माझे पहिले सहकार्य होते आणि मी त्याचा खूप आनंद घेतला. सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे. रणवीर खूप चांगला आहे आणि आलिया नैसर्गिक कलाकार आहे. चित्रपटात शबाना खूप चांगली आहे आणि जया, जिला मी नेहमी माझी गुड्डी म्हणतो. हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि मला आशा आहे की लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतील आणि त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करतील.