Join us

धर्मेंद्र यांनी लावला हा आरोप, म्हणाले यांच्यामुळेच पसरला कोरोना व्हायरस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 6:04 PM

धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे मत व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देया व्हिडिओद्वारे धर्मेंद्र सांगत आहेत की, आज लोकांना त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा मिळत आहे. कोरोना आपण केलेल्या वाईट गोष्टींचेच फळ आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. एखाद्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात येत आहे. पण तरीही लोक आपल्या घराच्या बाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना पसरण्यासाठी लोकच जबाबदार असल्याचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी म्हटले आहे.

धर्मेंद्र सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असले तरी ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांनी या व्हिडिओमध्ये कोरोना व्हायरसबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे. या व्हिडिओद्वारे ते सांगत आहेत की, आज लोकांना त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा मिळत आहे. कोरोना आपण केलेल्या वाईट गोष्टींचेच फळ आहे. आपण सगळ्यांनी माणुसकी दाखवली असती तर अशी गोष्ट घडलीच नसती... आता तर लोकांनी यातून शिकवण घेतली पाहिजे आणि माणुसकी दाखवली पाहिजे... सध्याच्या परिस्थितीमुळे मी प्रचंड दुःखी आहे. 

या व्हिडिओसोबत धर्मेंद्र यांनी एक खूप छान कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, जीवन जगताना एक चांगली व्यक्ती म्हणून तुमचे जीवन जगा... असे केल्यास देव तुमच्या प्रत्येक इच्छा-आकांक्षा पूर्ण करेल. 

कोरोना व्हारसच्या फैलावासाठी धर्मेंद्र यांनी लोकांनाच जबाबदार धरले असून त्यांचे हे मत लोकांना पटत आहे. सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.  

टॅग्स :धमेंद्रकोरोना वायरस बातम्या