Join us

काय! 'धर्मवीर'साठी प्रसाद ओक नाही तर या दिग्दर्शकच्या नावाचा विचार करत होते प्रविण तरडे, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 2:04 PM

प्रसाद ओक यांनी इतकी जिवंत व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांचा अभिनयचं कौतुक होतेय.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. गेल्या 13 मे रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय. प्रसाद ओक यांनी इतकी जिवंत व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांचा अभिनयचं कौतुक होतेय. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या लकबी हुबेहुब साकारल्या आहेत असे चित्रपट समीक्षक म्हणतायेत. 

या चित्रपटात दिघेंची भूमिका साकारण्यासाठी प्रविण तरडे यांची पहिली पसंती प्रसाद नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तरडे यांनी याबद्दल खुलासा केलाय. धर्मवीर चित्रपट भव्यदिव्य असावा असा माझा विचार होता. इतक्या मोठ्या व्यक्तिच्या आयुष्यावर सिनेमा करायचा म्हणजे कास्टिंगवर खूप मेहनत घेतली पाहिजे. बऱ्याच जणांचे लूक टेस्टही घेतलं. पण धर्मवीरांच्या भूमिकासाठी प्रसाद ओकचं नाव माझ्या डोक्यातही नव्हते. खरं सांगायचं तर या भूमिकेसाठी विजू माने यांचं नाव माझ्या डोक्यात होतं. कारण ते लहान पणापासून आनंद दिघेच्या सहवासात होते. पण  आनंद दिघेंच्या रुपात जेव्हा प्रसादला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आणखी विचार करण्याचा प्रश्नच नव्हता, असं तरडे म्हणाले. 

 ‘धर्मवीर’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट गेल्या 13 मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2.5 कोटींची दमदार कमाई करत, सगळ्यांना थक्क केलं. महाराष्ट्रभर 400 स्क्रिनवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 3.17 कोटींचा गल्ला जमवला आणि तिसऱ्या दिवशी रविवारी 3.86 कोटींचा बिझनेस केला. तीनच दिवसांत या चित्रपटाने 9.08 कोटींची कमाई केली.

टॅग्स :प्रसाद ओक प्रवीण तरडे