Join us  

धोनी चित्रपटाची पहिल्याच दिवशी 21.30 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई

By admin | Published: October 01, 2016 2:17 PM

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित 'धोनी: दी अनटोल्ड स्टोरी' चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रेकॉरर्डब्रेक कमाई केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित 'धोनी: दी अनटोल्ड स्टोरी' चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रेकॉरर्डब्रेक कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी 21.30 कोटींची रेकॉर्डब्रेक ओपनिंग करत चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत. सुशांत सिंग राजपूत या चित्रपटात धोनीची भुमिका साकारत आहे. 
 
प्रदर्शनाच्या दिवशी एवढी मोठी ओपनिंग घेणारा या वर्षातील हा दुसरा सिनेमा ठरला आहे. या वर्षात केवळ ‘सुलतान‘ चित्रपटाला इतकी चांगली ओपनिंग मिळाली होती. सुलतान चित्रपटाने पहिल्या दिवशी 36.54 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता धोनी चित्रपटाने रेकॉर्ड केला आहे.  पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा आतापर्यंतचा पहिलाच बायोपिक आहे, अशी माहिती समीक्षक तरण आदर्श यांनी दिली आहे. देशभरात जवळपास 3 हजार स्क्रिनवर हा सिनेमा रिलीज झाला आहे.