अन् स्टेजवरच ढसाढसा रडली दिया मिर्झा...! कार्यक्रमात टाळ्या आणि सोशल मीडियावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 11:18 AM2020-01-28T11:18:51+5:302020-01-28T11:26:39+5:30
अभिनेत्री दिया मिर्झाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत दिया भर कार्यक्रमात ढसाढसा रडताना दिसतेय.
अभिनेत्री दिया मिर्झाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत दिया भर कार्यक्रमात ढसाढसा रडताना दिसतेय. जयपूर येथे पार पडलेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमधील हा व्हिडीओ आहे. जयपुरातील दिग्गी पॅलेस येथे २३ ते २७ जानेवारी दरम्यान हा फेस्टिव्हल भरविण्यात आला होता. या फेस्टिवलमध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दियाने सुद्धा या फेस्टिवलमध्ये भाग घेतला. याचदरम्यान एका परिसंवादात बोलताना दिया मिर्झा स्टेजवरच ढसाढसा रडू लागली.
परिसंवादात बोलताना दिया रडतेय, हे बघून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण दिया हवामान आणीबाणीवर बोलत होती हवामान बदलाविषयी चिंता व्यक्त करताना दिया मिर्झा खूपच भावूक झाली. इतकी की, तिला स्वत:चे अश्रू रोखता आले नाहीत. हवामानाच्या बदल आणि त्याने उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीविषयी बोलताना तिला अचानक रडू कोसळले.
#WATCH Actor Dia Mirza breaks down while speaking at the 'climate emergency' session during Jaipur Literature Festival; she says, "Don't hold back from being an empath". (27.1.20) pic.twitter.com/fyAgH3giL9
— ANI (@ANI) January 28, 2020
‘कुणाचेही दु:ख, व्यथा समजून घेण्यापासून मागे हटू नका. तुमचे अश्रू अजिबात रोखू नका,’ असे ती रडत रडत म्हणाली. त्यानंतर एका व्यक्तीने दियाला टिशू पेपर आणले, त्यावर ‘धन्यवाद, पण मला या पेपरची गरज नाही,’असे ती म्हणाली आणि उपस्थित प्रत्येकाने दियासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या.
— #SupportCAA (@ExSecular) January 28, 2020
तिचा हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. हवामानावर बोलताना दियातील संवेदनशील कार्यकर्ता संपूर्ण देशाने पाहिला. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी तिचे कौतुक केले. अर्थात अनेकांनी तिला ट्रोलही केले. हा दिखावा कशासाठी? हवामानावर बोलताना रडते आणि एअर कंडिशन एसयूव्हीमध्ये फिरते,अशा शब्दांत अनेकांनी तिला ट्रोल केले. काहींनी तिच्या या रडण्याला ‘ओव्हरअॅक्टिंग’ म्हटले.
@deespeak ghar mai poora jungle kaat k lagwaya hai and stage pe I dont need paper, din bhar SUV mai ghoomti hai and environment cautious hai. Kuch to sharam kar
— blue (@anonwolfeyes) January 28, 2020
Late ho gye,
— Akshay Kashyap (@Liberal_Tiger) January 28, 2020
Padma Shree next year milna hai ab 🤣
दिया मिर्झा ही हवामान बदल कार्यकर्ता असून ती प्रदूषणाविरूद्ध मोहीमही राबवते. प्रदूषण आणि हवामान बदलाच्या विरोधात तिने अनेकदा आवाज उठविला आहे. काही दिवसांपूर्वी तिने मुंबईतील आरे जंगलामधील झाडांच्या कत्तलीविरोधात उघडपणे निषेध केला होता.