Join us

फ्रॉकसोबत चश्मा लावलेली ही बॉलिवूडची अभिनेत्री आहे तरी कोण, ओळखलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 16:03 IST

एका जाहिरामध्ये डायनाने दीपिकाला रिप्लेस केले होते.

अभिनेता-अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सशी कनेक्ट असतात. त्यांचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी सिनेमाचे ट्रेलर ते फॅन्ससोबत शेअर करत असतात.  बॉलिवूड अभिनेत्री डायना पेन्टीदेखील सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. 

 डायनाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या लहानपणीचे फोटो शेअर केला आहेत. यात ती मोठा चष्मा लावून खूपच क्युट दिसतेय. फोटोत डायना काही तरी बनवताना दिसतेय. डानयच्या फॅन्सनादेखील तिचा हा फोटो आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस तिच्या या फोटोवर केला आहे. सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी डायनाने मॉडलिंग श्रेत्रात आपली छाप सोडली होती. 

सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी डायनाने मॉडलिंग श्रेत्रात आपली छाप सोडली होती. ऐवढेच नाही तर एका जाहिरामध्ये डायनाने दीपिकाला रिप्लेस केले होते. कॉकटेल हिट गेल्यानंतर डायना चार वर्षांनी हॅपी भाग जाएगी सिनेमात दिसली. हा एक कॉमेडी सिनेमा होता.

याशिवाय डायना लखनऊ सेंट्रल, परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण, हॅपी फिर भाग जाएगी, खानदानी शफाखाना सारख्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. डायना 2011 साली इम्तियाज अली याच्या रॉकस्टार सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. मात्र मॉडलिंगच्या कॉन्ट्रॅक्टमुळे तिने या सिनेमासाठी नकार दिला. त्यानंतर रणबीर कपूरच्या अपोझिट या सिनेमात डायनाच्या जागी नरगिस फाखरीला घेण्यात आले. 

टॅग्स :डायना पेन्टी