Join us

या अभिनेत्रीने केले होते दीपिकाला रिप्लेस, रणबीरसोबत काम करण्यास दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 14:38 IST

रणबीरच्या अपोझिट या सिनेमात मग नरगिस फाखरीला घेण्यात आले.    

अभिनेत्री डायना पेंटी आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करतेय. डायना 2011 साली इम्तियाज अली याच्या रॉकस्टार सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. मात्र मॉडलिंगच्या कॉन्ट्रॅक्टमुळे तिने या सिनेमासाठी नकार दिला. त्यानंतर रणबीर कपूरच्या अपोझिट या सिनेमात डायनाच्या जागी नरगिस फाखरीला घेण्यात आले.    

त्यानंतर 2012  मध्ये आलेल्या कॉकटेल सिनेमातून डायनाने डेब्यू केला. इम्तियाज अलीने त्याचे नाव दिग्दर्शक होमी अदजानियाला सुचवले होते. या सिनेमा डायनासोबतदीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होती. 

सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी डायनाने मॉडलिंग श्रेत्रात आपली छाप सोडली होती. ऐवढेच नाही तर एका जाहिरामध्ये डायनाने दीपिकाला रिप्लेस केले होते. कॉकटेल हिट गेल्यानंतर डायना चार वर्षांनी हॅपी भाग जाएगी सिनेमात दिसली. हा एक कॉमेडी सिनेमा होता. याशिवाय डायना, लखनऊ सेंट्रल, परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण, हॅपी फिर भाग जाएगी, खानदानी शफाखाना सारख्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.   

टॅग्स :डायना पेन्टीदीपिका पादुकोणइम्तियाज अली