वरुण धवनला इंडस्ट्रीतील सर्वांत चांगले आचरण असणारा अभिनेता म्हणून ओळखले जाते. त्याच्या एकंदरीतच सर्व चित्रपटांमध्ये तो एकदम हॉट लूकमध्ये दिसत असला तरी अत्यंत सभ्य दिसतो. मात्र, असे काय झाले की, त्याने जॅकलिन फर्नांडिसला त्याच्या हाताचे मधले बोट दाखवून चिडवले. तुम्ही त्याचा काही दुसरा अर्थ काढण्याअगोदर तुम्हाला हे कळणे खूप गरजेचे होते की, हे सर्व मस्ती म्हणून सुरू होते. त्याचा काहीही दुसरा अर्थ नव्हता. दुबईला ‘तोईफा २0१६’ला ते दोघे जात होते. ते दोघे एअरपोर्टवर वेड्यासारखे धमाल करत होते. जॅकलिनने ठरवले की, तिला वरुणची फॅन म्हणून एक व्हिडीओ तयार करायचा आहे आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. सुपरस्टार असल्यासारखा अॅटिट्यूड दाखवून त्याने तिला काहीही प्रतिसाद दिला नाही; आणि तिला हाताचे मधले बोट वर करून चिडवले. तिने हा व्हिडीओ तिच्या स्नॅपचॅट अकाउंटवर पोस्ट केला आहे. खूप फनी व्हिडीओ आहे. ते दोघे ‘ढिशूम’ चित्रपटात एकत्र काम करीत आहेत. त्यांची एकत्र जोडी फार मस्त दिसत आहे.
सभ्य वरुणने जॅकलिनला हाताचे मधले बोट दाखवून चिडवले?
By admin | Published: March 21, 2016 1:47 AM