कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे कुठेही जाता येत नाही आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटणेदेखील कठीण झालं आहे. अशात अभिनेता इरफान खानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचे जयपूरमध्ये निधन झाले आहे. अशा परिस्थितीत त्याला आईचे शेवटचे दर्शन देखील घेता आले नाही. त्यामुळे व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन घेतले.
अभिनेता इरफान खानची आई सईदा बेगम यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी इरफान खानच्या आईने अखेरचा श्वास घेतला.
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे इरफान आपल्या आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे त्याने आपल्या आईचे शेवटचे दर्शन हे व्हिडिओ कॉलद्वारे घेतले.
इरफान खान अनेक दिवसांपासून आजारी आहे. २०१७ मध्ये जूनपासून इरफान उपचार घेण्याकरता परदेशात गेला होता. इरफान खानला कॅन्सर झाल्याचे त्याने सोशल मीडियावरून चाहत्यांना सांगितले होते. 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातून त्याने कमबॅक केले होते.