विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी आपलं रिलेशनशिप शेवटपर्यंत लपवून ठेवलं आणि अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. आता बॉलिवूडमध्ये याच कहाणीची पुनरावृत्ती होऊ शकते. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ( Sidharth Malhotra) व अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani ) यांच्याबद्दल. होय, सिद्धार्थ व कियारा दोघंही चित्रपटांशिवाय चर्चेत असतात ते त्यांच्या कथित रिलेशनशिपमुळे. या वर्षी रिलीज झालेल्या ‘शेरशाह’ या चित्रपटात सिद्धार्थ व कियारा दोघांचीही रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. एकमेकांच्या घरी भेटायलाही जातांनाही दोघांना स्पॉट केलं गेले. अर्थात अद्याप तरी दोघंही आपल्या रिलेशनशिपबद्दल काहीही बोललेले नाहीत. पण आता कदाचित वेळ आलीये.
होय, ‘बॉलिवूड लाईफ’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, नव्या वर्षात सिद्धार्थ व कियारा त्यांचं नातं ऑफिशिअल करू शकतात. सूत्रांनी सांगितलं की, सिद्धार्थ व कियाराचं नातं अगदी सुरूवातीच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे लग्नाचा निर्णय त्यांच्यासाठी घाईचा ठरेल. कतरिना व विकीची प्रेमकहाणी लग्नापर्यंत कशी पोहोचली, हे आपण सर्वांनी पाहिलं. सिद्धार्थ व कियारा सुद्धा असाच ‘स्टंट’ करू शकतात.
अन्य सूत्रांनी सांगितल्यानुसार, तूर्तास हे कपल लग्नाच्या विचारात नाही. पण लवकरच ते त्यांच्या नात्याची कबुली देऊ शकतात. होय, आम्ही कपल आहोत, असं ते जाहिर करू शकतात. दोघांनीही एकमेकांच्या पालकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत आणि कुटुंबीयांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने कदाचित नव्या वर्षांत सिद्धार्थ व कियारा ऑफिशिअल कपल म्हणून जगासमोर येऊ शकतात.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर सिद्धार्थ व कियाराकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. मिशन मजनू,योद्धा आणि थँक्स गॉड या चित्रपटात सिद्धार्थची वर्णी लागली आहे. यापैकी ‘मिशन मजनू’हा सिनेमा 13 मे 2022 रोजी रिलीज होणार आहे तर ‘थँक्स गॉड’ हा सिनेमा पुढील वर्षी 29 जुलैला चित्रपटगृहांत झळकणार आहे. ‘योद्धा’ हा सिद्धार्थचा आणखी एक सिनेमाही पुढील वर्षाअखेर प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. कियारा सुद्धा भुल भुलैय्या, जुग जुग जिओ, गोविंद नाम मेरा, आरसी 15 या चित्रपटांत झळकणार आहे.