रणबीर कपूर आणि आलिया भट स्टारर 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आहे. या चित्रपटावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली होती आणि त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली जात होती. पण या सगळ्याचा चित्रपटाच्या कमाईवर फारसा फरक पडला नाही. 'ब्रह्मास्त्र'नं रिलीज झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत चांगला व्यवसाय केला आहे. आता सोशल मीडियावर आणखी एक बातमी व्हायरल होत आहे की, बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी 10 कोटी रुपये घेतले आहेत.
सोशल मीडियावर बातमी होतेय व्हायरल दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी 'ब्रह्मास्त्र'चे साऊथमध्ये भरपूर प्रमोशन केले आहे. ते रणबीर कपूरसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये दिसले. राजामौली यांनी या चित्रपटाचे जाहिरपणं कौतुक ही केले. राजामौली हे साऊथमधील सर्वात लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. ही बातमी समोर आल्यानंतर 'ब्रह्मास्त्र'ला विरोध करणारे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चित्रपटाविरोधात सक्रिय झाले आहेत. मात्र, या बातमीचे सत्य वेगळेच आहे.
राजामौली यांनी घेतले १० कोटी?'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, एसएस राजामौली यांनी प्रमोशनसाठी 10 कोटी घेतल्याची बातमीत तथ्य नाही. करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजामौली यांनीत स्वतःहून 'ब्रह्मास्त्र'चे प्रमोशन केले आहे. खरं तर, करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसने 'बाहुबली'ला डिस्ट्रीब्यूट केले तेव्हापासून करण आणि राजामौली यांचे संबंध खूप चांगले आहेत. या संबंधांमुळे राजामौली यांनी स्वत: या चित्रपटाचे साऊथमध्ये प्रमोशन करायचे ठरवले.
१५० कोटीहून अधिक केली कमाई सोशल मीडियावर ब्रह्मास्त्रवर बॉयकॉट टाकण्याची बरीच मागणी होत आहे पण बॉक्स ऑफिसवर त्याचा काही फरक पडलेला नाही. या चित्रपटाने देश-विदेशात पहिल्या 5 दिवसांत 150 कोटींहून अधिक कमाई केली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.