बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनच्या निमित्ताने बिग बॉसच्या घरात एंट्री झाल्यापासून मेघा धाडेची जोरदार चर्चा सुरु झाली होती. बिग बॉसच्या घरातील तिचं वागणं, सहका-यांशी होणारी भांडणं आणि वाद यामुळे मेघा धाडे हिचे नाव प्रत्येक रसिकाच्या ओठावर होतं.नुकतेच बिग बॉस मराठीचं पहिल्या सिझनचं विजेतेपद तिनं पटकावलं. एका मीडिया रिपोर्टनुसार पहिल्या सिझनची विजेती ठरलेल्या मेघाला 18 लाख 60 हजार इतकी धनराशी तर मिळालीच याशिवाय निर्वाना लेजर रिअॅलिटी सिटी ऑफ म्युझिक ग्रुपकडून एक घरही भेट देण्यात आले आहे.
आपल्या आवडत्या व्यक्तींकडून किंवा कुणाकडूनही ही सरप्राईज भेट मिळाली तर तो दिवस ख-या अर्थाने स्पेशल ठरतो असाच काहीसा खास प्लॅन बिग बॉसनेही मेघासाठी केला होता. त्यामुळे बिग बॉसच्या घारबाहेर येताच मेघाच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही.... तिची अवस्थाही आज मै उपर आँसमा निचे अशीच झालीय असावी.
तसेच घराबाहेर येताच मेघाने केलेल्या खास बातचीत मध्ये सांगितले होते की,आजचा विजय मी माझ्या तमात चाहत्यांना, माझ्या मायबाप प्रेक्षकांना समर्पित करेल. त्यांच्यामुळेच मी इथे पोहोचलीय. माझ्या आजच्या विजयात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर बिग बॉसची ट्राफी माझ्या हातात नसती.मला या घराने खूप काही शिकवले. मी आत्मपरिक्षण करायला शिकले, हा माझ्यातील सगळ्यांत मोठा बदल. याशिवाय या घरातील माणसांनी मला अनेक टिप्स दिल्या आहेत. त्याही मी अंगी बाणवल्या आहेत.ते आत्ताच सांगू शकणार नाही़ पण होईल, इतके मात्र मी नक्की सांगेल़ बिग बॉसनंतर काही बंद झालेले मार्ग माझ्यासाठी उघडतील, याची मला खात्री आहे.
Bigg Boss Marathi : अंतिम स्पर्धकांनी बाहेर पडल्यानंतर शेअर केले अनुभव
बिग बॉसमधील अनुभवाबाबत सांगताना शर्मिष्ठा राऊत म्हणाली की, ''बिग बॉस 'च्या घरात राहणे सोपे नाही. इथे आल्यापासून मी कायमच स्वत:चा गेम खेळले. मेघा माझी चांगली मैत्रीण आहे. या घराने मला खूप काही शिकवले. घरात आले तेव्हा जिंकूनच बाहेर पडेन असे वाटले होते. '
तर पहिल्या तीन आठवड्यांमध्ये माझ्या वागण्यामूळे मी प्रेक्षकांचा रोष ओढावला होता. त्यामुळे टॉप पाचमध्ये असेन असे वाटले नव्हते, असे आस्ताद काळे म्हणाला व पुढे सांगितले की, ' या घराने माझ्यात खूप मोठा बदल घडवून आणला. काहीही बोलण्याआधी, कृती करण्याआधी दहा वेळा विचार करण्याची सवय या घरामुळे मला लागली. '
सईने सांगितले की 'या घराने मला मेघा व पुष्कर हे दोन मित्र दिले. घरात आले तेव्हा शंभर दिवस राहणार हा निर्धार करून आले होते. त्याप्रमाणे या घरात मी शंभर दिवस राहिले. '
पुष्करने आज तो या ठिकाणी केवळ आपल्या आई वडिलांमुळे असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या आई वडिलांचे आभार मानले व घरात येऊन कामे करायला शिकल्याचे त्याने सांगितले.