सुरेश वाडकर यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या सुरेल गायकीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिनेसृष्टीत आपल्या गायकीने खूप लोकप्रिय गाणी गायली आहेत.आपल्या सूरांची जादू दाखवणाऱ्या सुरेश वाडकर यांचे जेव्हा जेव्हा गाणे रसिकांच्या भेटीला आले तेव्हा तेव्हा संगीतप्रेमींसाठी एक ट्रीटच ठरली.'भवरे ने खिलाया फूल' या गाण्यापासून ते 'राम तेरी गंगा मैली हो गई' यानंतरही आलेल्या गाण्यांनी रसिकांची मनं जिंकली.
आपल्या गायकीने रसिकांची मनं जिंकणारे सुरेश वाडकर यांचा जगभरात प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यातही त्यांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. सुरेश वाडकर यांनी लग्नासाठी माधुरी दिक्षीतचे स्थळ नाकारले होते, मुलगी खुप सडपातळ असल्याचे कारण देत त्यांनी नकार दिला होता. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे.
सुरेश वाडकर यांनी प्रसिद्ध गायिका पद्मा वाडकर यांच्यासह लग्न केले आहे. पद्मा वाडकर देखील सिनेसृष्टीत प्रचंड प्रसिद्ध आहेत. पद्मा वाडकर यांनीही अनेक प्रसिद्ध गाणी गायली आहेत. त्यांचाही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
१९८८ मध्ये सुरेश वाडकर यांनी पद्मा वाडकर यांच्यासह लग्न केले. इंटरनेटवर या दोघांच्या लग्नाचे काही निवडक फोटोही पाहायला मिळतात. सुरेश आणि पद्मा यांना दोन मुली आहेत.अनन्या आणि जिया वाडकर अशी त्यांची नावं आहेत.
सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर या दाम्पत्यांच्या आवाजातले 'पाठशाला' फेम दिग्दर्शक मिलिंद ऊके यांच्या सिनेमात पहिल्यांदा मराठी गाणे एकत्र गायले होते. या गाण्याचे आजीवासन स्टुडियोमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले होते. रवी त्रिपाठी यांनी संगीत दिग्दर्शन केले होते हे गाणे संगीत प्रेमींनाही पसंतीस पात्र ठरले होते. 'राजना साजणा' या गाण्याच्या निमित्ताने सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर मराठीत पहिल्यांदाच ड्युएट गाताना दिसले त्यामुळे हे गाणे अधिकच स्पेशल होते.