Join us

तेरे जैसा यार कहां ! ही मराठमोळी अभिनेत्री आहे अभिज्ञा भावेची खास मैत्रिण, दोघींमध्ये आहे जबरदस्त बॉन्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 18:01 IST

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या सिनेइंडस्ट्रीत तशा अनेक अभिनेत्री मैत्रिणीत आहे, पण तिची जवळची मैत्रिण कोण आहे हे तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.

प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचं स्थान खूप महत्त्वाचं असते मग ते सर्वसामान्य असो किंवा सेलिब्रेटी.मराठी सिनेसृष्टीतील कलाकार ही आपल्या मैत्रीसाठी काहीही करायला तयार असतात. येथे निखळ मैत्री जपणारे अनेक कलाकार आहेत. खरं तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दोन अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र मराठी चित्रपटसृष्टील याला अपवाद आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत. यापैकीच एका जोडीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या सिनेइंडस्ट्रीत तशा अनेक अभिनेत्री मैत्रिणीत आहे, पण तिची जवळची मैत्रिण कोण आहे हे तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत. अभिज्ञा आणि अभिनेत्री मयुरी देशमुख एकमेकींच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. अनेक प्रसंंगी त्या एकमेकींच्या मागे खंबीर पण उभा राहिल्यात. सोशल मीडियावर त्या नेहमीच एकमेकींसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. 

मयुरीचा पती आशुतोष भाकरेचे निधन झाल्यानंतर तिला या ट्रोमामधून बाहेर यायला मदत केली ती तिच्या याच मैत्रिणीने. अभिज्ञाने तिला खूप समजावले आणि मग तिने इमली ही हिंदी मालिका स्विकारली होती सांगितले होते.असे मयुरीने एका मुलाखतीत सांगितले होते.सध्या अभिज्ञा तू तेव्हा तशी मध्ये झळकत आहे. तर मयुरी इमली या मालिकेत. 

टॅग्स :अभिज्ञा भावेमयुरी देशमुख