'मुझको भी तो लिफ्ट करा दे'' म्हणत अदनान सामीने साऱ्यांच्या काळजात अढळ स्थान प्राप्त केलं. अदनान सामीने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण तरल, परंतु दमदार आवाजामुळे लक्षावधी रसिकांच्या मनावर राज्य केले असून त्याच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. अदनाने आजवर बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. बजरंगी भाईजान या चित्रपटातील त्याची कव्वाली तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
अदनान प्रचंड प्रसिद्ध गायक असला तरी त्याच्या खाजगी जीवनाविषयी खूपच कमी जणांना माहीत आहे. त्याच्या पत्नीचे नाव रोया असून त्याला मेदिना ही अतिशय क्यूट मुलगी आहे. त्याची मुलगी दोन वर्षांची असून तो अनेक मुलाखतींमध्ये तिच्याविषयी आवर्जून सांगतो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला तर तिचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. तिचे फोटो अदनानच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून ते आवर्जून तिच्या फोटोला लाईक करतात. तसेच भरभरून कमेंट करतात.
मेदिनाच्या जन्मानंतर अदनानने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, माझ्या आयुष्यात घडलेली सगळ्याच चांगली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मेदिना. मी आणि रोया आम्हाला दोघांना देखील मुलगीच हवी होती. ती माझी लकी चार्म असून मला माझ्या संगीतासाठी एक नवीन प्रेरणा मिळाली आहे.
तसेच आयएनएसला दिलेल्या मुलाखतीत अदनान सामीने म्हटले होते की, मी माझ्या मुलीच्या जन्मानंतर खूपच बदललो आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण पूर्वीपेक्षा आता खूप सारी शॉपिंग करायला लागलो आहे. लहान मुलांच्या कपड्यांमध्ये नवीन काय फॅशन आली याविषयी मी अभ्यास करत असतो आणि तिच्यासाठी शॉपिंग देखील करत असतो.
मेदिनाचा जन्म 8 मे 2017 चा असून अदनानने तिचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला होता. तिच्या बर्थडे पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अदानानचे पहिले लग्न अभिनेत्री जेबा बख्तियारसोबत झाले होते. त्या दोघांचा घटस्फोट झाला असून त्यांना एक मुलगा देखील आहे. लग्नाच्या दोनच वर्षांत त्यांनी वेगळे व्हायचे ठरवले होते.