अभिनेता कुशल बद्रिके छोट्या पडद्यावरील चला येऊ द्या कार्यक्रमातून लोकप्रिय झाला. आपल्या विनोदी अभिनय कौशल्याने त्याने लोकांच्या मनात घर केले. त्याच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही खूप वाढ झाली आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. दरम्यान आता अभिनेत्याने आपल्या पत्नीसाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे, जी खूप चर्चेत आली आहे.
अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पत्नीचा फोटो शेअर करत लिहिले की, यार सुनयना,लग्नानंतर तू नोकरी करायचा निर्णय घेतलास आणि मी “अभिनय” क्षेत्रात struggle करायला मोकळा झालो. माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या “तू” एक हाती सांभाळल्यास. घराचे हप्ते, संसाराचा राडा, गंधारचं बालपण सगळं सगळं तू बघितलस. मी कुठेच नव्हतो ह्या सगळ्यात!आणि त्यानंतर कधीतरी “तू” स्वतःसाठी एक स्वप्न पाहिलंस “कथ्थक शिकायचं, आणि perform करायचं”.
अभिनेता कुशल बद्रिके बऱ्याचदा बायकोसोबतचे फोटो आणि मजेशीर व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते.