प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या शाही विवाहाची चर्चा एक महिना उलटून गेले तरी अजून ही सुरु आहे. त्यांच्या लग्नातील आणि संगीत सेरेमनी व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेत. आता करण कुंद्राने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रियांकाच्या संगीत सोहळ्यातील एक फोटो शेअर केला आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने जोधपूरच्या उमेद भवनात ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाह केला. त्यानंतर तिने मुंबईत आणि दिल्लीत लग्नाचे ग्रँड रिसेप्शनदेखील दिले. त्यानंतर हनीमूनसाठी प्रियांका स्वित्झर्लंडला रवाना झाली होती.
प्रियांका लवकरच आपला आगामी सिनेमा 'द स्काय इज पिंक’चे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर ती लगेच संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार आहे. भन्साळींच्या सिनेमात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते.प्रियांकाचा हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरातील मॅडम गंगुबाईच्या ख-या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.
हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्विन आॅफ बॉम्बे’ या पुस्तकात गंगूबाईची माहिती दिली आहे. चित्रपटाचे कथानक यावर आधारित असेल. आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या यापूर्वी ‘सात खून माफ’ या सिनेमात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.