चित्रपटाचा अंदाज बांधला जातो तो पोस्टरवरून. पोस्टरचा प्रवास काळ्या फळ्यावर खडूने चित्रपटाचे नाव लिहिण्यापासून सुरू झाला. कालपरत्वे हाताने रंगवलेले, प्रिंटेड तर आता अगदी थ्रीडीपर्यंत या पोस्टरची घोडदौड चालू आहे. पुढच्या पिढीची ओळख करून देणारा ‘डिजिटल पोस्टर’ हा आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित चित्रपट आॅक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हे पोस्टर्स बदलता ट्रेंड बदलत्या पिढीबरोबर पुढे जाणारे विज्ञान-तंत्रज्ञानाचाही इतिहास उलगडतात. त्यामुळेच थ्रीडी पोस्टर्स आणि आता राजवाडे अँड सन्स घेऊन येत असलेले डिजिटल पोस्टर हे आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय ठरत आहेत. दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा लिहिली आहे. प्रमुख भूमिकेत अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, सतीश आळेकर, ज्योती सुभाष, सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृत्तिका देव, पूर्णिमा मनोहर, राहुल मेहेंदळे, अमित्रीयन पाटील, सुहासिनी धडफळे यांच्या अभिनय अनुभवायला मिळेल.
‘डिजिटल पोस्टर’ ठरणार आकर्षण
By admin | Published: August 26, 2015 5:00 AM