Join us

'सुभेदार' ठरला वरचढ! IMDB रेटिंगमध्ये अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 1:55 PM

दिग्पाल लांजेकरांचा 'सुभेदार' चित्रपट IMDB रेटिंगमध्ये 'तान्हाजी'वर भारी पडला आहे.

‘फर्जंद, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांनंतर दिग्पाल लांजेकरांच्या ‘सुभेदार’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखरे २५ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे. टीझरपासूनच या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत होती. या चित्रपटातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. सुभेदारचा ट्रेलरही ट्रेंडिंग होता. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाच्या सात हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली होती. आता सुभेदारने नवा विक्रम केला आहे.

‘सुभेदार’ आधी तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची गाथा सांगणारा ‘तान्हाजी’ हा बॉलिवूड चित्रपट २०२०साली प्रदर्शित झाला होता. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने शूरवीर तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली होती. तर शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत होता. या चित्रपटात सैफ अली खान, देवदत्त नागे, काजोल, अजिंक्य देव हे कलाकार झळकले होते. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. ‘तान्हाजी’ चित्रपटाला आयएमडीबी(IMDB)वरही चांगलं रेटिंग मिळांल होतं. पण आता ‘सुभेदार’ने ‘तान्हाजी’ला आयएमडीबी(IMDB) रेटिंगमध्ये मागे टाकलं आहे.

“मराठी माणसाने महाराष्ट्र सोडला पाहिजे”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारणारे अजय पूरकर असं का म्हणाले?

दिग्पाल लांजेकरांचा ‘सुभेदार’ आयएमडीबी(IMDB) रेटिंगमध्ये ओम राऊतच्या तान्हाजी चित्रपटापेक्षा वरचढ ठरला आहे. आयएमडीबी(IMDB)वर अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाला ७.५ रेटिंग मिळालं होतं. आता ‘सुभेदरा’ने आयएमडीबी(IMDB)वरही दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटाला आयएमडीबी(IMDB)वर तब्बल ९.५ रेटिंग मिळालं आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘तान्हाजी’वर भारी पडला आहे.

‘सुभेदार’ची चिंता वाढली! प्रदर्शित होताच क्लायमॅक्स सीन व्हायरल, दिग्पाल लांजेकर विनंती करत म्हणाले, “कृपया...”

दरम्यान ‘सुभेदार’ चित्रपटात अजय पूरकर तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत आहेत. तर चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, स्मिता शेवाळे, विराजस कुलकर्णी, समीर धर्माधिकारी अशी कलाकारांची तगडी फौज आहे.

टॅग्स :दिग्पाल लांजेकरअजय देवगणअजय पुरकरमराठी चित्रपटबॉलिवूडचिन्मय मांडलेकर