बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. बुधवारी सकाळी खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ११ डिसेंबर, १९२२ साली पाकिस्तानमधील पेशावरमध्ये एका मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव युसुफ खान होते. सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले तेव्हा देविका राणी यांनी त्यांचे नाव बदलून दिलीप कुमार ठेवले.
दिलीप कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये ६२ सिनेमात काम केले. त्यांनी शेवटचा सिनेमा फक्त १२ लाख रुपयात साइन केला होता आणि त्यांना पूर्ण रक्कम कॅशमध्ये मिळाली होती. हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.
दिलीप कुमार त्यांच्या काळात सर्वाधीक मानधन घेणार कलाकार होते. १९५०च्या काळात ते एका चित्रपटासाठी एक लाख रुपये मानधन घेत होते. ही रक्कम त्याकाळात खूप जास्त होती.