Join us

४ वर्षातच का मोडला होता दीपिका कक्करचा संसार?, स्वतःचा धर्म बदलून सहअभिनेत्या सोबत केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 4:01 PM

तिच्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर दीपिका चर्चेत आली होती..

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) सध्या तिच्या पर्सनल लाईफला घेईन चर्चेत आहे. 'ससुराल सिमर का' (Sasural Simar Ka) मधून अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली. तिचा अभिनय लोकांना खूप आवडला होता. मात्र, कामाव्यतिरिक्त अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही चर्चेत होती. तिच्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर दीपिका चर्चेत आली होती, 

४ वर्षानंतर झाला होता घटस्फोट दीपिका कक्करने 2011 मध्ये पायलट रौनक सॅमसनशी लग्न केले, त्याच वर्षी अभिनेत्रीचा हिट शो 'ससुराल सिमर का' देखील सुरू झाला. त्यांचं हे लग्न केवळ 4 वर्षे टिकू शकले. 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आजही घटस्फोटाचे खरं कारण कोणालाच माहीत नाही. तिचं पहिलं लग्न तुटण्याचे कारण तिचा सहअभिनेता शोएब इब्राहिम असल्याचे अनेकांचे मत आहे.

का मोडलं होतं लग्न?'ससुराल सिमर का'मध्ये, दीपिकाच्या ऑन-स्क्रीन पती प्रेमची भूमिका शोएब इब्राहिमने साकारली होती. दीपिका आणि शोएबमध्ये सेटवर जवळीक वाढू लागली, याचा परिणाम अभिनेत्रीच्या पहिल्या लग्नावर परिणाम झाला, असे म्हटले जाते. मात्र, अभिनेत्रीने नेहमीच ही गोष्टी खोटी असल्याचं म्हटलं. दीपिका अनेकवेळा हावभावांमध्ये सांगते की, तिच्या पहिल्या लग्नाचा अनुभव खूपच वाईट होता. काही काळापूर्वी, दीपिकाने एका व्लॉगमध्ये ट्रोलर्सना उत्तर देताना  म्हणाला होती की, तिला यापूर्वी काय वेदना सहन कराव्या लागल्या आहेत हे लोकांना माहित नाही. बरं, तिचं पहिलं लग्न का मोडलं हे फक्त तिलाच माहीत.

दीपिका तिच्या दुसऱ्या लग्नात खूप आनंदी आहे. 2018 मध्ये तिने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर शोएब इब्राहिमशी लग्न केले. तिनं आपले नाव बदलून फैजा ठेवलं. लवकरच दीपिका तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. 

टॅग्स :दीपिका कक्कर