Dipika Kakar Pregnant: दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल आहे. दोघांच्याही लग्नाला 5 वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघांच्या घरी पाळणा हलणार आहे. होय, काही क्षणांपूर्वी दीपिका व शोएब यांनी आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. दीपिकाने शोएबसोबतचा एक पाठमोरा फोटो शेअर करत, आईबाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. फोटोत दोघंही बसलेले असून त्यांनी डोक्यावर मॉम आणि डॅड असं लिहिलेली कॅप घातली आहे.
कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि थोडीशा घाबरलेल्या मनाने ही बातमी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. आमच्या आयुष्यातील हा एक सुंदर टप्पा आहे. होय, आम्ही आमच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहोत!! लवकरच आम्ही पालक होणार आहोत, असं दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. दीपिकाच्या प्रेग्नंसीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र त्यावेळी दिपिकाने या सर्व अफवा आहेत असं सांगितलं होत. मात्र आता तिने स्वत:च ही बातमी सांगितल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.