दिग्दर्शनात ‘अ‍ॅक्शन मास्टर’ फेल

By Admin | Published: January 3, 2016 04:17 AM2016-01-03T04:17:15+5:302016-01-03T04:17:15+5:30

बॉलीवूडच्या मसाला चित्रपटांचा इतिहास पाहिला, तर या चित्रपटांच्या यशात सर्वात मोठे योगदान अ‍ॅक्शन दृश्यांना द्यावे लागेल. अ‍ॅक्शन चित्रपटांना सामान्य दर्शक जास्त आवडीने बघतात

Direction 'Action Master' failed | दिग्दर्शनात ‘अ‍ॅक्शन मास्टर’ फेल

दिग्दर्शनात ‘अ‍ॅक्शन मास्टर’ फेल

googlenewsNext

बॉलीवूडच्या मसाला चित्रपटांचा इतिहास पाहिला, तर या चित्रपटांच्या यशात सर्वात मोठे योगदान अ‍ॅक्शन दृश्यांना द्यावे लागेल. अ‍ॅक्शन चित्रपटांना सामान्य दर्शक जास्त आवडीने बघतात, म्हणूनच अ‍ॅक्शन चित्रपटांची निर्मिती प्रत्येक काळात कायम राहिली. अ‍ॅक्शन चित्रपटांच्या यशात अ‍ॅक्शन मास्टरची मेहनत जास्त राहते. बॉलीवूडच्या इतिहासात बरेच अ‍ॅक्शन मास्टर असे होते की, ज्यांनी दिग्दर्शनाच्या मैदानात पाऊल ठेवले आणि सर्वांनी आपापल्या चित्रपटांमध्ये स्वाभाविकच अ‍ॅक्शन ओरिएंटेड चित्रपट बनविले. मात्र, यातील कोणाच्याही चित्रपटांना बॉक्स आॅफिसवर फारसे यश मिळाले नाही. याच कारणाने कोणताच अ‍ॅक्शन मास्टर या क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यात यशस्वी नाही झाला.

अ‍ॅक्शन मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेले
राम शेट्टी हे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात येणारे
पहिले व्यक्ती होते. त्यांनी ८० व्या दशकात चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरून संजय दत्तसोबत ‘खतरनाक’ चित्रपट बनविला. ९०मध्ये श्रीदेवीसोबत बनलेल्या ‘आर्मी’पासून या क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘शोले’च्या थीमवर बनलेल्या या चित्रपटात शाहरूख खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.
तो बॉक्स आॅफिसवर चित्रपट विशेष काही करू शकला नाही. राम शेट्टीनंतर अजून एक स्टंट डायरेक्टर पप्पू वर्माने दिग्दर्शनाच्या मैदानात उडी घेतली. या काळात पप्पू वर्मा आणि त्यांचे भाऊ अ‍ॅक्शन मास्टरच्या भूमिकेत वेगाने पुढे आले. पप्पू वर्माशिवाय त्यांचे भाऊ टीनू वर्मादेखील दिग्दर्शक बनले. त्यांचे अजून एक भाऊ महेंद्र वर्मानेदेखील स्टंट मास्टर म्हणून बऱ्याच चित्रपटात काम केले. योगायोग असा की, राम शेट्टीसारखाच पप्पू वर्मानेदेखील अगोदर संजय दत्तचा चित्रपट ‘जान की बाजी’ (१९८५)सोबत निर्मितीत पाऊल ठेवले. १९९२ मध्ये ‘वंश’ चित्रपटापासून पप्पू वर्मा दिग्दर्शनात आले. दोन सावत्र भावांवर बनलेल्या या चित्रपटात, सिद्धार्थ आणि सुदेश बेरी यांची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाचे गाणे सुपर हिट झाले होते, ज्यामुळे चित्रपट खूप चालला होता. पप्पूचे भाऊ टीनू वर्मा यांनी दिग्दर्शनात नशीब आजमावत, सनी देओलसोबत ‘मां तुझे सलाम’ चित्रपट बनविला, जो सुपर फ्लॉप राहिला. जेपी दत्ता व राजकुमार संतोषींच्या चित्रपटात अ‍ॅक्शन सांभाळणाऱ्या टीनूने आमीर खानच्या ‘मेला’मध्ये खलनायकाचा रोल केला होता.
वर्मा भावांशिवाय या यादीत अजून एक स्टंटमॅन रवी दीवान यांनी सुनील शेट्टी आणि रवीना टंडनच्या जोडीसोबत ‘विनाशक’ चित्रपट बनविला. जो बॉक्स आॅफिसवर विनाशकारी ठरला. यानंतर रवी दीवान पुन्हा दिग्दर्शनाकडे वळलेच नाही. अजय देवगनचे वडील वीरू देवगन फार काळापर्यंत स्टंट मास्टर म्हणून सक्रिय होते. त्यांचे दिग्दर्शनात येण्याचे स्वप्न अजयने पूर्ण केले. दिग्दर्शक म्हणून वीरू देवगन यांनी आपला मुलगा अजयला घेऊन भारत-पाकिस्तानच्या संबंधांवर ‘हिंदुस्तान की कसम’ हा चित्रपट बनविला, जो अयशस्वी ठरला.
आता बॉलीवूडचे दोन चर्चित अ‍ॅक्शन मास्टर दिग्दर्शक बनण्याच्या तयारीत आहेत. श्याम कौशल आणि एलन अमिनच्या बाबतीत ही चर्चा सुरू आहे. एलन अमिनच्या चित्रपटात अक्षय कुमार नायक असेल, अशीही चर्चा आहे, तर श्याम कौशल आपला मुलगा राज कौशलला सोबत घेऊन चित्रपट बनवू शकतो, आताच आलेल्या ‘मसान’ चित्रपटात तो नायक होता.

Web Title: Direction 'Action Master' failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.