Join us

दिग्दर्शकही बघतात लक-अनलक!

By admin | Published: February 10, 2016 1:40 AM

लक-अनलक असा काही प्रकार आहे की नाही, हा तसा कायम वादाचा विषय राहिला आहे. परंतु बॉलीवूडमध्ये आजही अनेक जण यावर विश्वास करीत असतात. चित्रपटाच्या मुहूर्तापासून

लक-अनलक असा काही प्रकार आहे की नाही, हा तसा कायम वादाचा विषय राहिला आहे. परंतु बॉलीवूडमध्ये आजही अनेक जण यावर विश्वास करीत असतात. चित्रपटाच्या मुहूर्तापासून ते शीर्षकापर्यंत अनेक ठिकाणी याचा प्रत्यय येत असतो. असाच एक प्रकार पुन्हा नव्याने घडला आहे. तिग्मांशू धुलियाचा चित्रपट ‘मिलन टॉकीज’ला बनविण्याचा आतापर्यंत पाच वेळा प्रयत्न झाला. मात्र कोणत्या तरी कारणाने चित्रपटाला अडथळे येत आहेत. याचा दोष आता चित्रपटाच्या शीर्षकाला दिला जात आहे.या चित्रपटात आधी इमरान खान (आमीरचा भाचा), नंतर इमरान हाश्मी, नंतर शाहिद कपूर, नंतर सुशांत सिंह राजपूत आणि त्याही नंतर वरुण धवन आदींच्या नावांची घोषणा झाली. एकता कपूरची कंपनी बालाजी या चित्रपटाला बनविणार होती. मात्र पाचदा फेरबदल झाल्यानंतरही ते शक्य झाले नाही. आता तर तिग्मांशूने हे शीर्षकच अनलकी असल्याचे सांगून टाकले आहे. हा पहिलाच चित्रपट नाही ज्याच्याबाबतीत असे घडले. ‘टाइम मशिन’ नावाच्या चित्रपटाला तीनदा बनविण्याचा प्रयत्न झाला. मात्र एकदाही हा चित्रपट तयार होऊ शकला नाही. प्रकाश मेहरानेही पाच वेळा ‘कायर’ नावाचा चित्रपट बनविण्याची घोषणा केली. ८० च्या दशकात पहिल्यांदाच मेहरा यांनी अमिताभ बच्चनसोबत हा प्रयत्न केला. पण ते जमले नाही. नंतर संजय दत्त आणि राजेश खन्ना (ज्यांनी कधी सोबत काम केले नाही) सोबत हेमामालिनी आणि टीना मुनीमच्या टीमसोबत कायर बनविण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर मेहराने मिथून चक्रवर्तीला ‘कायर’साठी कास्ट केले. नंतर अक्षय कुमार आणि नंतर जानी राजकुमारचा मुलगा पुरुला लाँच करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यातही यश न आल्याने अखेर चित्रपटाचे शीर्षक ‘बाल ब्रह्मचारी’ केले गेले. कादर खान यांनी ‘जाहिल’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली. ज्याचे दिग्दर्शन ते स्वत: करणार होते आणि मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चनला कास्ट करणार होते. बिग बीसोबत ताळमेळ न बसल्यामुळे अखेर कादर खान यांनी काही वर्षांनंतर गोविंदासोबत हा चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला. तेही जमले नाही. अखेर हे शीर्षकच अनलकी आहे, असे समजून निर्णय बदलण्यात आला.

- anuj.alankar@lokmat.com