Join us

ही कसली स्वरा ही तर बेस्वरा, केंद सरकारवर निशाणा साधताच भडकले दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 11:22 AM

किशोर कुमार यांचे गाजलेले गाणे ''मेरे मेहबुब कयामात होगी'' अशी कॅप्शन देत देशांतील गंभीर परिस्थितीवर भाष्य केले आहे.

सोशल मीडियावर  देशाती सद्यपरिस्थितीवर तसेच सरकारबद्दल नेहमीच तिचे मत मांडत असते. स्वरा भास्करने पुन्हा एकदा सरकारबद्दल एक ट्विट केले आहे. तिच्या ट्विटमध्ये तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. किशोर कुमार यांचे गाजलेले गाणे ''मेरे मेहबुब कयामात होगी'' अशी कॅप्शन देत देशांतील गंभीर परिस्थितीवर भाष्य केले आहे. व्हिडीओ शेअर करत तिने म्हटले की, आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठ्या विश्वासाने आम्ही निवडून दिले आहे ते ही दोन वेळा. त्यांना भारताच्या जनतेकडून हा खास संदेश म्हणत तिने नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. 

 हे ट्विट बघून दिग्दर्शक अशोक पंडित यांनी स्वरावर संताप व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीतही स्वरा भास्कर देशात विष पसरवण्याचे काम करत आहे. स्वरा नाही बेस्वरा म्हणत त्यांनी स्वरावर तीव्र टीका केली आहे. बेस्वरा तू तर तुकडे तुकडे गँगची सदस्य आहेस, ज्यांनी देशात फक्त विष पसरवण्याचे काम केले. जे काम करत आहेत त्यांना पुरावा देण्याची गरज नाही, जरा घराबाहेर पड आणि लोकांची मदत करत,  देशात थोडं फार प्रमाणात पसरणारे विषही कमी होईल.अशोक पंडित यांच्या या ट्विटला अनेक नेटक-यांनी लाईक्स करत रिट्विटही केले आहे.

अनेकांना स्वराचेही ट्विट चांगलेच खटकले, स्वरा विरोधात ट्विट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर एकाने म्हटलंय की, ज्या गायकाची गाणं स्वराने ट्विट केले आहे. त्यावेळच्या सरकारने याच गायकाच्या गाण्यांवरही बंदी आणली होती. तर एकाने म्हटलंय की, जर थोडी तर माणुसकी शिल्लक असेल तर, व्हॅक्सिन उपलब्ध करु दे, लोकांची सेवा केलीस तर आम्हीही तुझे म्हणणे ऐकू, उगाच आरडो ओरड करुन काही होत नाही, घरा बाहेर पड आणि लोकांची मदत कर, लोकांची प्रार्थनाच शेवटी तुझ्या कामात येणार आहेत.

देशाचं स्मशान झालं तरी चालेल, पण 'मालका'ची प्रतिमा मलिन व्हायला नको; स्वरा भास्करचा टोला

आजतकने थेट राघव चढ्ढा यांनी जाहीर माफी मागितल्याचे सांगत सगळ्या गोष्टी ट्विटच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले.हे ट्विट पाहून स्वरा भास्करचा मात्र चांगलाच पारा चढला आणि थेट रिट्वीट करत तिनेही निशाणा साधला. वाहवा आजतक राघव चढ्ढा यांनी आणखीही काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्या गोष्टीही हेडलाईनमध्ये टाकणे जरा जास्त रिलेव्हंट झाले असते.

टॅग्स :स्वरा भास्करभाजपा