Join us

मयुरी देशमुखच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट; म्हणाला, "आहे तशीच राहा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:13 IST

एका दिग्दर्शकाने तिच्यासाठी केलेली बर्थडे पोस्ट व्हायरल होत आहे.

मराठी मालिकांमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) तिच्या निरागस सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. सध्या ती 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत दिसत आहे. मयुरीने नुकताच वाढदिवस साजरा केला. यानिमित्त कलाकार आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान एका दिग्दर्शकाने तिच्यासाठी केलेली बर्थडे पोस्ट व्हायरल होत आहे.

अनेक नाटकांचं लेखन, दिग्दर्शन करणारा नीरज शिरवईकरने मयुरी देशमुखच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे. तिच्यासोबतचा फोटो शेअर करत तो लिहितो, "फार काही नाही. मरेपर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन. आहेस तशीच राहा. मजा कर आणि असेच अनेक सूर्यास्त एकत्र बघू. वाढदिवसाच्या शुभेच्छा. थोडा उशीर झाला पण आता ही पोस्ट करतोय." यासोबत त्याने हॉर्ट इमोजीही शेअर केला. 

नीरजच्या या पोस्टवर मयुरी कमेंट करत लिहिते, 'पोस्ट करायला उशीर झाला असला तरी मी याचा आनंद कायम साजरा करेन. To eternity'. नीरज शिरवईकर हा थिएटरमधील लोकप्रिय लेखक दिग्दर्शक आहे. त्याने परफेक्ट मर्डर, आमने सामने, sad सखाराम सह अनेक नाटकांचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. नीरजचं लग्न झालं असून त्याला एक मुलगाही आहे.  मयुरी आणि नीरज एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. मयुरीनेही 'डिअर आजो' हे नाटक स्वत: लिहिलं होतं. 

मयुरी देशमुख सध्या मालिका, सिनेमांमध्ये भूमिका साकारत आहे. २०२० साली तिच्या पतीने नैराश्यातून आत्महत्या केली. यामुळे तिला मोठा धक्का बसला होता. काही काळ ती मनोरंजनविश्वापासून दुरावली होती. नंतर 'इमली' मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं. सध्या मयुरी एकटी आयुष्य जगत आहे. 

टॅग्स :मयुरी देशमुखमराठी अभिनेतानाटकसोशल मीडिया