चित्रपटसृष्टीत सरोज खानचे नाव कोरियोग्राफर म्हणून सुवर्ण अक्षरे लिहिले गेले आहे. 3 जुलैला त्यांनी या जगाच्या निरोप घेतला. त्यांची लहान मुलगी सुकैना नागपाल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, अनेकांना प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांच्यावर बायोपिक बनवायची इच्छा होती. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाने सरोज खान यांच्या बायोपिक बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार, सरोज खानची धाकटी मुलगी सुकैना नागपाल यांनी सांगितले की, 'मी आईला एक दिवस विचारले की आतापर्यंत तुझ्या आयुष्यावर तीन लोकांनी बायोपिक बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुला यापैकी कोणासोबत तुझा बायोपिक बनवण्याची इच्छा आहे. यावर तिने रेमो डिसूझाच्या नावाला पसंती दिली होती.
रिपोर्टनुसार, रिमो डिसूझो म्हणाला, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सरोजजी अशा महिला होत्या ज्यांनी संघर्ष आणि कठोर परिश्रम याच्या जोरावर यश मिळवले होते. त्यांच्या संघर्षाची तुलना कोणाशीही करता येणार नाही. सरोज खान यांच्या संघर्षाला बघून मी त्यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याचे ठरवले होते. त्यांनी देखील हसत- हसत यासाठी होकार दिला होता आणि लवकर सिनेमा बनव असे सांगितले होते.