सिनेमा असो किंवा एखादा इव्हेंट.सुंदर दिसण्यासाठी बॉलिवूडच्या या अभिनेत्री स्वत:च्या मेकअपवर बरीच मेहनत घेतात. या अभिनेत्रींच्या सौंदर्यावर कित्येक जण घायाळ होतात. त्यांचं हे सौंदर्य... अदा... लुक्स पाहून त्यांच्यासारखं सुंदर दिसावं असं अनेकांना वाटतं. मात्र रिल आणि चमचमत्या दुनियेतल्या या अभिनेत्री रियल लाइफमध्ये मेकअपविना कशा दिसतात याची अनेकांना उत्सुकता असते. सध्या अभिनेत्री दिशा पटानीचे विविध अदा असलेले फोटो सोशल मीडियावर अधिक पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते. मात्र अता तिचे विनामेकअप फोटोंनाही पसंती मिळत असून चाहते तिचे कौतुकही करताना दिसतायेत.
कुणालाही मोहात पाडेल असे दिशाचं सौंदर्य... मेकअपविना तिचा हा अवतार साधा वाटत असला तरी गोरीपान दिशा कुणालाही भुरळ घालेल... मेकअप असो किंवा नसो तिचा अंदाज कायम सारखाच असतो... तिच्या स्टाईल आणि सौंदर्यात फारसा फरक तुम्हाला जाणवणार नाही... त्यामुळे फॅन्सना तिचा हा रिअल अवतार जास्त पसंत असल्याचे यावरून पाहायला मिळत आहे.
सध्या दिशा सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे बहुतांश शूटींग संपले आहे.‘भारत’ या चित्रपटात दिशा प्रथमच सलमान खान, कॅटरिना कैफ, नोरा फतेही, तब्बूसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल.