बॉलिवूडमध्ये स्वत:च्या सौंदर्य आणि टॅलेंटवर वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी (Disha Patani).. दिशाचा जन्म उत्तराखंडच्या पिथोरागड येथे झाला. त्यानंतर दिशा उत्तर प्रदेशातील बरेली इथं कुटुंबासोबत राहत होती. तिच्या वडिलांचे नाव जगदिश सिंह पटानी आहे. ते डीएसपी अधिकारी होते. दिशाची एक मोठी बहीण आहे तिचं नाव खुशबू पटानी. दिशा पटानी एमिटी यूनिवर्सिटी, नोएडा येऊन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगमधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे.
दिशा पटानीला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. होय... दिशाने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न नव्हते. तिला भारतीय हवाई दलात पायलट व्हायचे होते.
दिशा पटानीने मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, लखनऊमध्ये तिच्या इंजिनीअरिंगदरम्यान एका मैत्रिणीने तिला मॉडेलिंग स्पर्धेबद्दल सांगितले होते. याच स्पर्धेने तिला मुंबईत आणले. ही स्पर्धा ती जिंकली आणि तिच्या मॉडेलिंगच्या प्रवासाची सुरुवात झाली. ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिला मॉडेलिंग प्रोजेक्टमध्ये काम मिळू लागले. दिशाने सांगितले की, तिने कॉलेजपासूनच कमाई करायला सुरुवात केली.
२०१४ मध्ये पौंडच्या फेमिना मिस इंडियामध्ये तिने भाग घेतला. जिथे तिला फर्स्ट रनर अप पुरस्कार मिळाला. त्यानंतर दिशाची ओळख वाढतच गेली. दिशाने कॅडबरी डेअरी मिल्कमध्येही प्रचार केला. दिशाने सिनेमातील करिअरची सुरुवात २०१५ मध्ये दक्षिण भारतातील प्रसिद्ध दिग्दर्शक जगन्नाथ पुरी यांचा सिनेमा लोफरपासून केली होती.
ज्याठिकाणी ते वरूण तेजसोबत दिसली. या सिनेमात तिने हैदराबादमधील एका मुलीची भूमिका साकारली. त्यानंतर दिशाच्या करिअरमध्ये काही विशेष बदल झाला नाही. दिशा पटानीला २०१६ भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी यांच्या बायोपिक सिनेमा धोनी एन अनटोल्ड स्टोरीत काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात महेंद्र सिंग धोनची पहिली प्रेयसी प्रियंका हिची भूमिका तिने केली होती. या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती.