Disha Patani Dinner Date: टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा पाटनीच्या आयुष्यात ‘मिस्ट्री मॅन’ची एन्ट्री? हा हँडसम आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 12:57 PM2022-11-07T12:57:43+5:302022-11-07T12:59:04+5:30
Disha Patani : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. सध्या दिशा सतत एका मिस्ट्री मॅनसोबत फिरताना दिसतेय...
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून दिशा तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. दिशा व टायगर श्रॉफ (Tiger Shroff) कधीकाळी नात्यात होते. दोघांनीही आपल्या नात्याची कधी कबुली दिली नाही. पण दोघांचं नातं कुणापासूनही लपून राहिलं नव्हतं. याचदरम्यान दोघांच्या ब्रेकअपचीही बातमी आली होती. अर्थात चाहत्यांना यावरही विश्वास बसेना. पण आता दिशा सतत एका मिस्ट्री मॅनसोबत फिरताना दिसतेय.
काल दोघंही वांद्रे येथील एका रेस्टॉरंट बाहेर दिसले. यावेळी मिस्ट्री मॅन पूर्णवेळ दिशाला प्रोटेक्ट करताना दिसला. तो तिच्यासोबत गाडीत आला आणि तिच्यासोबत निघून गेला. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने दिशा व तिच्या मिस्ट्री मॅनचा व्हिडीओ शेअर करताच, चाहतेही थक्क झालेत. अनेकांनी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. अरे, दिशाला नवा बकरा मिळाला, अशा शब्दांत दिशाला ट्रोल करण्यात आला.
कोण आहे हा मिस्ट्री मॅन?
आता दिशाचा हा मिस्ट्री मॅन कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर त्याचं नाव अलेक्झांडर एलेक्स (Aleksandar Alex) आहे. तो दिशाचा जिम ट्रेनर आहे. अलेक्झांडर व दिशा चांगले मित्र आहेत. तो मॉडेल आहे. ‘गिरगिट’ या वेबसीरिजमधून अलेक्झांडरने अॅक्टिंग डेब्यू केला होता. त्याला हिंदी बोलता येत नव्हतं. पण या वेबसीरिजसाठी तो हिंदी शिकला. दिशा पाटनी अनेकदा आपल्या या मित्रासोबतचे फोटो शेअर करत असते.
आता दोघांत फक्त मैत्री आहे की हे नातं मैत्रीपुढे गेलंय, हे ठाऊक नाही. पण अलेक्झांडरसोबत दिशा सध्या जाम खूश्श आहे. अनेकांच्या मते, दिशा व अलेक्झांडर मित्र आहेत. पण काहींच्या मते, दिशा त्याला डेट करतेय. आता खरं काय ते लवकर कळेलच.