Disha salian death जून २०२० मध्ये दिशा सॅलियन आणि अभिनेता सुशांत सिंग राजपुत या दोघांच्या मृत्युने खळबळ उडाली होती. २ वर्ष उलटुन गेले तरी या दोन्ही प्रकरणाचा तपास CBI सीबीआय करत आहे. आता अखेर सीबीआयने दिशा सॅलियनचा मृत्यु कसा झाला याचे गुढ उकलले आहे. सीबीआयने दिशा सॅलियन प्रकरणासंबंधित अंतिम अहवाल दिला आहे.
मुंबईची टॅलेंट मॅनेजर दिशा सॅलियन हिचा मृत्यु हा अपघातच होता असा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे. यासोबत सीबीआय दिशा सॅलियन आणि सुशांत सिंग राजपुत यांच्या मृत्युमध्ये काही कनेक्शन आहे का याचाही तपास करत होते. दिशाचा मृत्यु कसाझाला, तिचे कॉल डिटेल्स, सुशांत सिंगचे कॉल डिटेल्स, साक्षीदार या सर्व तपासानंतर दिशा सॅलियनच्या मृत्युबाबत हा निष्कर्ष काढला आहे.
२८ वर्षीय दिशा सॅलियनचा मृत्यु ८ जून २०२० रोजी मालाड येथील घरी झाला होता. त्या दिवशी मध्यरात्री गॅलेक्सी रिजेंट इमारतीच्या १४ मजल्यावरुन पडुन तिचा जीव गेला. तेव्हा घरात पार्टी सुरु होती आणि दिशाने दारु प्यायली होती असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते.