Join us

किंगखान शाहरूख खानच्या ‘झिरो’ने रिलीजआधीच कमावले १०० कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 7:39 PM

किंगखान शाहरूख खान सुमारे दीड वर्षांनंतर ‘झिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये वापसी करतोय.सध्या या चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, या चित्रपटाने रिलीजआधीचं १०० कोटी रूपये कमावले आहेत.

किंगखान शाहरूख खान सुमारे दीड वर्षांनंतर ‘झिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये वापसी करतोय. साहजिकचं शाहरूखच्या चाहत्यांना ‘झिरो’कडून बऱ्याच अपेक्षा आहेत. तूर्तास चाहते आतुरतेने शाहरूखच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत आहेत. येत्या २ नोव्हेंबरला शाहरूखच्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, या चित्रपटाने रिलीजआधीचं १०० कोटी रूपये कमावले आहेत. होय, ‘झिरो’चे वितरण हक्क १०० कोटी रूपयांत विकले गेले आहेत. शाहरूखचे मागचे काही चित्रपट ‘मिनिमम गॅरंटी’वर विकले गेले होते. पण यावेळी ‘झिरो’ चे हक्क ‘अ‍ॅडव्हान्स बेसिस’वर विकले गेले आहे़त. याचा अर्थ डिस्ट्रिब्युटर्सला तोटा झालाच तर ते रिफंडसाठी दावा करू शकतील. अर्थात ‘झिरो’चे राईट्स १०० कोटींमध्ये विकले गेले असले तरी हा आकडा २०१५ मध्ये आलेल्या ‘दिलवाले’पेक्षा कमी आहे. होय, ‘दिलवाले’चे राईट्स १३० कोटी रूपयांत विकले गेले होते. हे यासाठी कारण ‘झिरो’ रिलीज झाल्यानंतर पुढच्याच आठवड्यात रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ रिलीज होतो आहे. त्यामुळे यावेळी ‘झिरो’चे राईट्स ‘दिलवाले’पेक्षा कमी किमतीत विकल्या गेले आहेत.आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट २१ डिसेंबर २०१८ रोजी रिलीज होतोय. चित्रपटात शाहरूख खानशिवाय कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.तुम्हाला माहित असेलच की, आनंद एल राय दिग्दर्शित याचित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटात अनुष्का शर्मा एका यशस्वी महिला शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे. तर कॅटरिना कैफ एका व्यसनी हिरोईनची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान एका विशेष कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. त्याची भूमिका सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे. केवळ इतकेच नाही तर काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट या सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. एका गाण्यात सलमान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीही झळकणार आहेत. श्रीदेवींनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या वाट्याचे सीन शूट केले होते. त्याअर्थाने ‘झिरो’ हा श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे.

टॅग्स :झिरो सिनेमाशाहरुख खान