अवघ्या १९व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी दिव्या भारतीच्या सौंदर्य, तिचा डान्स, तिची अदा, तिचा अभिनय... तिच्या प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा असायचे. अगदी लहान वयात बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी दिव्या भारतीने वयाच्या १९ व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनाच्या बातमीने तर अख्या देश हादरला होता. दिव्या आज या जगात नसली तरी रसिकांच्या हृदयात ती आजही कायम आहे. १९९०मध्ये तेलुगू फिल्म 'बोब्बिली राजा'पासून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. अल्पावधीतच दिव्या योशशिखरावर पोहचेली होती.
छोट्याशा कारकीर्दीत दिव्याने एक से बढकर एक भूमिका साकारल्या दिव्याने 1990 'विश्वात्मा' या सिनेमा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात दिव्यावर चित्रीत झालेले 'सात समुंदर पार' हे गाणे आजही लोकांच्या ओठी आहे आहे. याव्यतिरिक्त, तिने 14 चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी बहुतेक सिनेमे हिट ठरले.
करिअर ऐनभरात असतानाच दिव्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. को-स्टारसोबतच्या सततच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे दिव्या त्रासली होती. या अफवांना पूर्णविराम लावण्यासाठी दिव्याला लवकरात लवकर लग्न करायचे होते. २० मे १९९२ मध्ये तिनं बॉलिवूड फिल्म निर्माता आणि दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला सोबत लग्न केलं. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, लग्नाच्या अवघ्या 11 महिन्यांतच दिव्या भारतीचा मृत्यू झाला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर साजिद यांनी एका मुलाखतीत उघड केले होते, की त्यांनी खूप घाईत दिव्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला होता.
लग्नाच्या काही महिन्यानंतरच दिव्याच्या रहस्यमय मृत्यू झाल्याने. तिचा मृत्यू का झाला, कसा झाला, हे रहस्य आज इतक्या वर्षांनंतरही कायम आहे. दिव्याच्या मृत्युकडे संशयाने पाहणारे लोक तिचा कथित पती साजिद नाडियाडवाला याला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवतात. पण हे कधीच सिद्ध होऊ शकले नाही.
पोलिसांनी रिपोर्टमध्ये दारूच्या नशेत बालकनीमधून पडल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. ५ एप्रिल १९९३ रोजी फ्लॅटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला. ज्या दिवशी दिव्याचा मृत्यू झाला, त्याच दिवशी ती चेन्नईहून शूटींग करून परतली होती. यानंतर ती हैदराबादेत शूटींगसाठी जाणार होती. नव्या फ्लॅटचे डीलही तिले साईन केले होते.