रसिकांची लाडकी इशी माँ म्हणजेच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने छोट्या पडद्यावर ये हैं मोहब्बते मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं होतं. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली होती. त्यापैकी रसिकांची लाडकी म्हणजे इशी माँ. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने ही भूमिका साकारली होती. दिव्यांकाची ही भूमिका रसिकांना फारच भावली. घराघरात इशी माँ म्हणूनच तिची ओळख बनली. संस्कारी बहू दिव्यांका आता 'खतरो के खिलाडी ११' शोमध्ये सहभागी झाली आहे. आजवर लोकांनी तिला संस्कारी सूनेच्या भूमिकेत बघितले.आता ती खतरों के खिलाडी म्हणत वेगवेगळे स्टंट करताना दिसरणार आहे.
या शोसाठी सगळेच केपटाऊनला रवाना झाले आहेत. सगळेच स्पर्धक तिथली मजा मस्ती कॅम-यात कैद करत चाहत्यांसह शेअर करत आहे. नुकतेच स्पर्धकांचे खास बिकनीशूट करण्यात आले. यावेळी बिकनी घालणार नसल्याचे सांगत दिव्यांकाने थेट साडीमध्येच बिचवर फोटोशूट केले. या फोटोशूट दरम्यानचा एका व्हिडीओही तिने शेअर केला आहे.
इतर सगळ्या बिकीनीमध्ये पोजवर पोज देत आहेत. पण दिव्याका मात्र साडीमध्येच पोज देत असल्याचे पाहायला मिळत आहे. फोटोशूटसाठी खास लाल रंगाची साडी तिने परिधान केली होती.या साडीमध्ये दिव्यांकाच्या सौंदर्याला चारचाँद लागले होते.
ऑनस्क्रीन जितकी सुंदर दिव्यांका दिसते तितकीच ऑफस्क्रीन दिसते. या फोटोशूट दरम्यानचे फोटो पाहून चाहत्यांच्याही नजरा हटत नाहीत. दिव्यांकाच्या साडीपुढे बिकीनी अदाही फिक्या पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुळात दिव्यांकाला तोकडे कपडे घालायला आवडत नाही. भारतीय पेहराव खूप आवडतो. ज्यात ती कम्फर्टेबल नसेन तो ड्रेस ती कधीच घालत नाही.
ट्रेंड आणि फॅशनचा विचार न करता जे आवडेल तेच ती परिधान करते. उगाच फॅशन आणि ट्रेंडच्या मागे धावण्यापेक्षा काही तरी स्वतःचे हटके स्टाईल करा आणि तुमची तीच स्टाईल एक फॅशन बनेल यातच खरी मजा आहे हेच सांगण्याचा प्रयत्न दिव्यांकाने तिच्या फोटोशूटमध्ये केला आहे.